Home » आंतरराष्ट्रीय » चीनमध्ये वर्षभरानंतर Coronaमुळे दोन मृत्यू, नव्या व्हेरिएंटनं वाढवली चिंता

चीनमध्ये वर्षभरानंतर Coronaमुळे दोन मृत्यू, नव्या व्हेरिएंटनं वाढवली चिंता

चीनमध्ये-वर्षभरानंतर-coronaमुळे-दोन-मृत्यू,-नव्या-व्हेरिएंटनं-वाढवली-चिंता

बीजिंग, 19 मार्च: चीनमध्ये (China) जानेवारी 2021 नंतर दोन कोविड-19 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशात कोरोना व्हायरसची ओमायक्रॉन व्हेरिएंट (omicron variant) वेगानं पसरत आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननं (China’s National Health Commission) एका निवेदनात म्हटलं आहे की, शुक्रवारी जिलिनमध्ये कोविडमुळे दोन मृत्यू झाले. चीनमध्ये कोरोना संसर्गाची सर्वाधिक नवीन प्रकरणे जिलिन प्रांतातून येत आहेत. आतापर्यंत येथे 3000 हून अधिक कोरोना बाधित आढळले आहेत. चीनमध्ये कडक निर्बंध असूनही कोरोना संसर्गाचा वारंवार विस्फोट होताना दिसत आहे. लोकांना प्रथम डेल्टा व्हेरिएंटनंतर ओमायक्रॉनपासून संसर्ग होत आहे. कोरोना संसर्गामुळे चीनमधील काही लोक 2021 च्या मध्यापासून गंभीर आजारी आहेत. दरम्यान कोविड-19 ची गंभीर लक्षणे असलेले अनेक लोक वाचले. 60 वर्षांवरील आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेले लोकही कोरोना व्हायरसची लागण होऊनही वाचले. शांघायमध्ये शाळा बंद बीजिंगमध्ये येणाऱ्यांसाठी जागतिक न्यूक्लिक अॅसिड चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. शहरात प्रवेश केल्यानंतर 7 दिवसांसाठी लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास, एकत्रित बसून खाणं आणि मेळाव्यास उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. येथे फेब्रुवारी 2020 नंतरची सर्वात वाईट परिस्थिती सांगितली जात आहे. चीनमध्ये वेगानं पसरत असलेल्या कोरोना संसर्गामुळे जगातील इतर देशांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट डेल्टाक्रॉनने ठोठावलं दार जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अहवाल दिला आहे की जगभरात डेल्टाक्रॉनची प्रकरणे वाढू लागली आहेत. डेल्टाक्रॉन कोरोनाची नवीन लाट आणू शकते अशी चिंता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, फ्रान्स, यूके, नेदरलँड आणि डेन्मार्कसह युरोपातील अनेक देशांमध्ये डेल्टाक्रॉनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अमेरिकेच्या काही भागांमध्ये डेल्टाक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. डेल्टाक्रॉन हे कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटनी बनलेलं एक नवीन व्हेरिएंट आहे. एकाच व्यक्तीला डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन्हींचा संसर्ग होतो शास्त्रज्ञांच्या मते, या नवीन व्हेरिएंटचा कणा डेल्टा आणि स्पाइक ओमायक्रॉनचा बनलेला आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा कोणताही व्हायरस बदलतो किंवा त्याचे स्वरूप बदलतो तेव्हा असं संयोजन पाहिलं जातं. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन भिन्न व्हेरिएंटचा संसर्ग होऊ शकतो. डेल्टाक्रॉनच्या बाबतीत एकाच व्यक्तीला कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन्ही व्हेरिएंटचा संसर्ग होत आहे.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Corona virus in india, Coronavirus

Leave a Reply

Your email address will not be published.