Home » आंतरराष्ट्रीय » फिनलंड देश आनंदी देशांच्या यादीत अव्वल, भारत कोणत्या स्थानावर?

फिनलंड देश आनंदी देशांच्या यादीत अव्वल, भारत कोणत्या स्थानावर?

फिनलंड-देश-आनंदी-देशांच्या-यादीत-अव्वल,-भारत-कोणत्या-स्थानावर?

काही देश संस्कृती, परंपरा, पर्यटन स्थळं आदी गोष्टींमुळे ओळखले जातात, तर अमेरिका, रशियासारख्या देशांची सर्वार्थानं बलाढ्य म्हणून ओळख आहे. पण काही तुलनेनं लहान देश विशिष्ट अशा गोष्टीसाठी ओळखले जातात.

  • Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 मार्च: प्रत्येक देशाची खास अशी ओळख असते. काही देश संस्कृती, परंपरा, पर्यटन स्थळं आदी गोष्टींमुळे ओळखले जातात, तर अमेरिका, रशियासारख्या देशांची सर्वार्थानं बलाढ्य म्हणून ओळख आहे. पण काही तुलनेनं लहान देश विशिष्ट अशा गोष्टीसाठी ओळखले जातात. संयुक्त राष्ट्र संघाने (United Nation) नुकताच अ‍ॅन्युअल हॅपीनेस इंडेक्स (Annual Happiness Index) जाहीर केला. त्यानुसार फिनलंड, डेन्मार्क, आईसलंड, स्वित्झर्लंड आणि नेदरलंड या देशांचा समावेश जगातील टॉप -5 सर्वांत आनंदी देशांच्या यादीत झाला आहे. हे देखील या राष्ट्रांचं अनोखं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि भारत भलेही जगातील शक्तीशाली देश म्हणून नावारुपास येत असले तरी या यादीत या देशांचे नाव सर्वांत खाली आहे. `यूएन`च्या अहवालानुसार, फिनलंडने (Finland) सलग पाचव्यांदा या यादीतील आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं असून, तालिबानी राजवटीशी संघर्ष करणारा अफगाणिस्तान (Afghanistan) सर्वांत दुःखी देश ठरला आहे. तसंच या यादीत पाकिस्तानचा (Pakistan) क्रमांक भारतापेक्षा (India) वर आहे. या विषयीचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, जगभरातील आनंदी देशांच्या यादीत अमेरिका (America) 16 व्या स्थानावर असून, त्यानंतर 17 व्या क्रमांकावर ब्रिटन (Britain) आहे. जीवनशैलीत सुधारणा झाल्याने आनंदी देशांच्या यादीत सर्बिया, रोमानिया, बल्गेरिया या देशांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. दुसरीकडे लेबनॉन, व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तान या देशांच्या क्रमवारीत सर्वाधिक घसरण झाल्याचं दिसत आहे. जागतिक आनंद निर्देशांक अर्थात वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये (World Happiness Index) तालिबानी राजवट असलेला अफगाणिस्तान हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान (Taliban) पुन्हा सत्तेत आले आणि हा देश या यादीत आणखी पिछाडीवर गेला. आर्थिक मंदीचा सामना करणारा लेबनॉन या यादीत 144 व्या क्रमांकावर तर झिम्बाब्वे 143 व्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानला वेळेत मदत मिळाली नाही तर तेथील परिस्थिती आणखी बिघडू शकते, असं मत युनिसेफनं व्यक्त केलं आहे. तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळेल मोठी रक्कम `यूएन`कडून गेल्या १० वर्षापासून वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स तयार केला जातो. हा अहवाल तयार करण्यासाठी लोकांच्या आनंदाचे मूल्यमापन केलं जातं. त्यासाठी आर्थिक आणि सामाजिक आकडेवारीचाही आधार घेतला जातो. तीन वर्षांच्या सरासरी डाटावर आधारित आनंद शून्य ते 10 या प्रमाणात मोजला जातो. संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia-Ukraine War) करण्यापूर्वी तयार करण्यात आला होता. त्यामुळे या यादीत रशिया 80 व्या तर युक्रेन 98 व्या स्थानावर आहे. मात्र युद्धाची स्थिती पाहता रशिया आणि युक्रेनच्या क्रमवारीतही घसरण होऊ शकते. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी सुधारली आहे. या यादीत भारत 136 व्या स्थानावर आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत भारत अजूनही पाकिस्तानच्या मागे आहे. गेल्या वर्षी या यादी भारत 139 व्या स्थानावर होता. यावेळी त्यात सुधारणा होत, भारत आता 136 व्या स्थानावर पोहोचला आहे. शेजारील 121 व्या क्रमांकावर असेलल्या पाकिस्तानची स्थिती भारतापेक्षा चांगली असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या रिपोर्टचे सहलेखक जेफ्री सॅक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वर्षानुवर्ष जागतिक आनंद अहवाल तयार केल्यानंतर असं लक्षात येतं की आनंदासाठी सामाजिक पाठबळ, औदार्य, सरकारचा प्रामाणिकपणा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जागतिक स्तरावरील नेत्यांनी ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे. हा अहवाल तयार करणाऱ्यांनी कोरोनापूर्व आणि कोरोनानंतरचा कालावधी निवडला आहे. या दरम्यान सरकारविषयी लोकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. लोकांच्या भावनांची तुलना करण्यासाठी सोशल मीडियावरील डाटाही घेण्यात आला. 18 देशांमध्ये चिंता आणि दुःख वाढले तर संतापाची भावना कमी झाल्याचं दिसून आलं.“ वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समधले टॉप 20 देश असे 1. फिनलंड 2. डेन्मार्क 3. आईसलंड 4. स्वित्झर्लंड 5. नेदरलंड 6. लॅग्जमबर्ग 7. स्वीडन 8. नॉर्वे 9. इस्त्राइल 10. न्यूझीलंड 11. ऑस्ट्रिया 12. ऑस्ट्रेलिया 13. आयर्लंड 14. जर्मनी 15. कॅनडा 16. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 17. युनायटेड किंग्डम/ब्रिटन 18. चेक रिपब्लिक 19. बेल्जियम 20. फ्रान्स

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: India

Leave a Reply

Your email address will not be published.