Home » आंतरराष्ट्रीय » Shocking! सुट्टीचा आनंद लुटताना कमी झाली महिलेची 4 इंच हाइट; नेमकं काय झालं पाहा

Shocking! सुट्टीचा आनंद लुटताना कमी झाली महिलेची 4 इंच हाइट; नेमकं काय झालं पाहा

shocking!-सुट्टीचा-आनंद-लुटताना-कमी-झाली-महिलेची-4-इंच-हाइट;-नेमकं-काय-झालं-पाहा

लंडन, 20 मार्च : सुट्ट्या एन्जॉय करून घरी आल्यानंतर बहुतेक लोक प्रवासामुळे थोडे थकलेले असतात, त्यांना थोडासा थकवा जाणवतो. तर काही जणांना आरोग्याच्या काही ना काही समस्या उद्भवतात. एका महिलेला तर सुट्ट्यांनंतर अशी समस्या उद्भवली ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. सुट्ट्यांचा आनंद लुटता लुटता या महिलेची उंची कमी झाली (Woman shorter after accident on vacation). यूकेत राहणारी 27 वर्षांची जेनिफर प्रोक्टर स्पेनमध्ये सुट्ट्या घालवायला गेली होती. ती मार्जोकातील अक्वालँड वॉटर पार्कमध्ये गेली होती. तिथं वॉटर स्लाइडवर तिचा भयंकर अपघात झाला. त्यानंतर तिची सर्जरी झाली आणि यानंतर तिने आपली उंची कमी झाल्याचा दावा केला आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार  जेनिफर पार्कमध्ये 40 फूट उंच वॉटर स्लाइडवरून खाली येत होती. तेव्हा ती पुलाला धडकली आणि तिच्या मणक्याच्या हाडात दुखापत झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वॉटर पार्कमध्ये या दुर्घटनेनंतर तिची सर्जरी झाली. कित्येक महिने ती हॉस्पिटलमध्ये होती. ऑपरेशननंतर तिला धक्काच बसला. कराण तिची हाइट कमी झाली होती. सर्जरी झाल्यानंतर जेनिफरची हाइट 4 इंच कमी झाली. तिची उंची 5 फूट 11 इंच होती. ती कमी होऊन 5 फूट 7 इंच झाली. हे वाचा – तुमच्या आयुष्याचं रहस्य उलगडेल हा एक PHOTO; फक्त द्या एका प्रश्नाचं उत्तर 2019 साली जेनिफरसोबत ही दुर्घटना घडली होती. जेनिफर सांगते, ती आपल्या सुट्ट्या एन्जॉय करायला गेली होती. पण या एक दुर्घटनेने तिचं आयुष्य बदललं. दुर्घटनेमुळे तिला खूप समस्या उद्भवली. शिक्षिका असलेल्या जेनिफरला नोकरीही सोडावी लागली. आता तिने कोर्टात धाव घेतली आहे. नुकसान भरपाई म्हणून वॉटर पार्क कंपनीकडून 5 लाख युरो मागितले आहेत.

Published by:Priya Lad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Health, Lifestyle

Leave a Reply

Your email address will not be published.