Home » आंतरराष्ट्रीय » Watch Video: भुक्कड हत्ती, खाण्यासाठी भिंत तोडणारा हत्ती कधी पाहिलात का?

Watch Video: भुक्कड हत्ती, खाण्यासाठी भिंत तोडणारा हत्ती कधी पाहिलात का?

watch-video:-भुक्कड-हत्ती,-खाण्यासाठी-भिंत-तोडणारा-हत्ती-कधी-पाहिलात-का?

Watch Video:भुकेलेल्या हत्तीनं (Hungry Elephant) एका महिलेच्या घरातल्या किचनची भिंत (Smashing kitchen Wall)तोडली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jun 23, 2021 09:44 AM IST

थायलंड, 23 जून: भुकेलेल्या हत्तीनं (Hungry Elephant) एका महिलेच्या घरातल्या किचनची भिंत (Smashing kitchen Wall)तोडली आहे. दक्षिण थायलंडच्या (southern Thailand) हुआ हिन येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. हत्तीनं किचनची भिंत तोडून शिरकाव केला. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. (viral video)

मध्यरात्री किचनमधून आवाज येऊ लागल्यानं राचादावन फुंगप्रसोपर्न (Rachadawan Phungprasopporn) आणि तिचा पती जागे झाले. त्यानंतर ते दोघं किचनमध्ये गेले. किचनमध्ये जाताच दोघांना धक्कादायक चित्र दिसलं. एक हत्ती त्यांच्या किचनची भिंत तोडून आत येण्याचा प्रयत्न करत होता. ते जाईपर्यंत हत्तीनं बरीच भिंत तोडली होती. भिंत तोडून हा हत्ती खाण्याचं सामान शोधत होता. त्यानंतर भुकेलेल्या हत्तीनं तांदळानं भरलेली प्लास्टिक बॅग हिसकावली आणि ती घेऊन पसार झाला.

आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हत्तीनं कशी भिंत तोडून किचनमध्ये शिरकाव केला आहे.

राचादावन यांनी डेली मेलला सांगताना म्हटलं की, या हत्तीला या भागात चांगलंच ओळखलं जातं. कारण हा हत्ती खूप त्रास देतो. दोन महिन्यांपूर्वीही हा हत्ती घरात घुसला होता. पण त्यावेळी त्यानं काही नुकसान केलं नव्हतं. तसंच भिंतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे 50,000 बात (1.17 लाख रुपये) खर्च येईल, असंही राचादावन यांनी सांगितलं.

Published by: Maharashtra Maza News

First published: June 23, 2021, 9:42 AM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *