७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ ला भारत बंद झालाच पाहिजे भारत बंदला जाहीर पाठिंबा….

कोल्हापूर

कोल्हापूर/प्रतिनिधी● गोरख कांबळे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात संसदमध्ये अन्यायी विधेयक आणून अत्यंत गदारोळात अन्यायी विधेयक पास करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावाण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे. या विरोधात गेले १० दिवस दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन अहोरात्र सुरू आहे. दिल्ली येथे शून्य अंश सेल्सिअस तापमान असताना मोदी सरकारने पोलीसांकरवी आंदोलन शेतकर्‍यांच्या वरती थंड पाण्याचे फवारे मारून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रकार सरकार करीत आहे.
या शेतकर्‍यांच्या न्यायासाठी झगडत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणे, करिता उद्या मंगळवार दिनांक ८/१२/२०२० रोजी संपूर्ण भारत बंद पुकारला आहे. या भारत बंद आंदोलनामध्ये कागल तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना, कागल तालुका राष्ट्रीय काँग्रेस, कागल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन मुक्ती पार्टी बामसेफ व मित्र पक्षांच्या वतीने कागल, मुरगुड, गडहिंग्लज शहर या महाविकासआघाडी मार्फत उद्या मंगळवार दिनांक. ८/१२/२०२० रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून संपूर्ण तालुका कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे. सदरच्या बंदला कागल विधानसभा मतदार संघातील सर्व व्यापारी, उद्योजक, सहकारी संस्था व तरुण मंडळ या सर्वांनी शेतक-यांना हक्काचा न्याय मिळवून देण्याकरिता उद्याचा बंद उस्फूर्तपणे सहभाग घेऊन भारत बंदला पाठिंबा द्यायला, अशी माहिती कागल येथे महाविकास आघाडीच्या व केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक ईगल प्रभाळकर, स्वाभिमानी संघटनेचे सागर कोंडेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक प्रविण काळबर, बाबासो नाईक, विवेक लोटे, सिद्धार्थ नागरत्न, सागर शिंदे, संजय चितारी, संजय ठाणेकर, हारुण मुजावर, सुधाकर सोनुले व सर्व पक्षाचे सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

5 thoughts on “७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ ला भारत बंद झालाच पाहिजे भारत बंदला जाहीर पाठिंबा….

  1. When I initially left a comment I appear to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on each time a comment is added I receive 4 emails with the exact same comment. There has to be an easy method you are able to remove me from that service? Thanks a lot! Mel Andonis Picardi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *