हॉटेलमध्ये आग; लोकांनी पाचव्या मजल्यावरुन घेतल्या उड्या, 10 जणांचा मृत्यू, Video

हॉटेलमध्ये-आग;-लोकांनी-पाचव्या-मजल्यावरुन-घेतल्या-उड्या,-10-जणांचा-मृत्यू,-video

नवी दिल्ली 29 डिसेंबर : कंबोडियातील एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. AFP या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पॉईपेटमधील ग्रँड डायमंड सिटी हॉटेलमध्ये सुमारे 50 लोक अडकल्याची माहिती आहे. घटनास्थळावरील धक्कादायक फुटेजमध्ये लोक पाचव्या मजल्यावरून उडी मारताना दिसत आहेत. या दुःखद अपघातादरम्यान इमारतीची अंशतः पडझड झाल्याचीही नोंद झाली आहे, तर अग्निशमन दलाने नंतर आगीवर सुमारे ७०% नियंत्रण मिळवण्याचा दावा केला आहे.

Ajab Gajab : जोरदार वारा सुटल्यास हलू लागतो टॉवर; स्टॅनवे टॉवरची खास वैशिष्ट्यं माहितीय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजेपर्यंत सुमारे 53 लोकांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे. आपत्कालीन बचाव प्रक्रियेला गती देण्यासाठी आजूबाजूचे लोकही अधिकाऱ्यांना मदत करत आहेत. हॉटेल आणि कॅसिनो कॉम्प्लेक्समध्ये सुमारे सहा तास आग “अनियंत्रितपणे” सुरूच असल्याचे अहवालात म्हटले आहे. एका व्हिडिओ क्लिपमध्ये छताचा मोठा भाग अजूनही जळत असल्याचे दिसत आहे.

🚨#BREAKING: People are jumping out of a Hotel due to a massive fire

📌#Poipet l #Cambodia Watch as disturbing video shows People jumping out of the Grand Diamond City Hotel in Poipet Cambodia as a Massive fire burns uncontrollably with reports of many trapped inside the hotel pic.twitter.com/qzS7WT2e19 — R A W S G L 🌎 B A L (@RawsGlobal) December 29, 2022

घटनास्थळावरील व्हिडिओ समोर आला असून आपला जीव वाचवण्यासाठी लोक इमारतीवरुन उड्या मारताना दिसत आहेत. यात अनेकजण जखमीही झाले आहेत.

Corona : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; रुग्णालये, स्मशानांमध्ये मृतदेहांचा खच, Viral Video

ही अनियंत्रित आग पाहून कंबोडियाने आग आटोक्यात आणण्यासाठी थायलंडमधून आपत्कालीन कर्मचाऱ्यांना पाचारण केले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कंबोडियातील पॉईपेट येथील ग्रँड डायमंड सिटी कॅसिनो आणि हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत मृतांमध्ये बहुतांश थाई नागरिक आहेत. आगीच्या ज्वाळांमुळे, धुरात श्वास घेताना त्रास आणि अनेकांनी मजल्यावरून उडी मारल्याने 30 जण जखमी झाले आहेत. कॉम्प्लेक्सच्या बाजूला गॅसच्या टाकीमध्ये स्फोट झाल्यामुळे ही आग लागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *