हे तर मोहन भागवत यांच्या…; अंधारेंचा वारकऱ्यांवर गंभीर आरोप, वाद आणखी चिघळणार?

हे-तर-मोहन-भागवत-यांच्या…;-अंधारेंचा-वारकऱ्यांवर-गंभीर-आरोप,-वाद-आणखी-चिघळणार?

हे तर मोहन भागवत यांच्या….; सुषमा अंधारेंचा वारकऱ्यांवर गंभीर आरोप, वाद आणखी चिघळणार?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांबद्दल आणि संतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र आता यावरून सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांबद्दल आणि संतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र आता यावरून सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांबद्दल आणि संतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र आता यावरून सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई, 25 डिसेंबर :  गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांबद्दल आणि संतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढत आहेत, मात्र यावरूनच आता  अंधारे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर पलटवार गेला आहे. व्हायरल क्लिप हे भाजपाचे षडयंत्र आहे. खरा वारकरी असा वाद घालणार नाही. असं काही अमंगल करणार नाही. पंधरा वर्षांनंतर ही क्लिप व्हायरल होत आहे. विरोध करणारे हे किर्तनकार नाहीत, ते पेड किर्तनकार आहेत, प्रहसनकार आहेत. मोहन भागवत यांच्या संप्रदायचे ते किर्तनकार आहेत असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला आहे.

फडणवीसांवर आरोप  

दरम्यान त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केला आहे. राज्यपाल हटाव व इतर गोष्टींना झाकण्याचे टीम देवेंद्रजींचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एरक भाग म्हणून माझ्या क्लिपचा वापर केला जात आहे. देवेंद्रजींच्या भाषेत मी जर चार महिन्यांचे बाळ असेल आणि चार महिन्यातच त्यांना सळो की पळो करत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांच्या मनात किती राग असेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. माझ्या क्लिपबाबत चर्चा होते, मात्र सावरकरांनीही तेच लिहून ठेवलं आहे, श्री श्री रविशंकर यांनी देखील हेच लिहलं आहे, मग त्यावर चर्चा का होत नाही. मी शिवसेनेत असल्यामुळे हे सर्व सुरू असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

हेही वाचा : दिशा सालियान प्रकरण अचानक चर्चेत कसं आलं?, राऊतांनी नेमकं कारण सांगितलं

शिंदेंना टोला  

दरम्यान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे उद्या मोदींना आव्हान देऊन पंतप्रधानपदावर दावा करणारे नाव असणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे चाळीस आमदार कधी भाजपमध्ये गेले हे शिंदे यांना कळणार देखील नाही असं अंधारे यांनी म्हटलं आहे.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *