'ही फक्त सुरुवात! कोरोनाची नवी लाट जगभरात कहर करणार आणि लाखो लोकांचा..'

नवी दिल्ली 27 डिसेंबर : चीनमधील कोरोना विषाणूमुळे बिघडलेल्या परिस्थितीमध्ये आता जगभरातील देशांवर त्याचा धोका निर्माण झाला आहे. चीनसोबतच जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या महामारी रोगशास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की कोरोना महामारीची एक नवीन आणि अत्यंत धोकादायक लाट चीन आणि उर्वरित जगामध्ये पुन्हा कहर करण्यास तयार आहे. यामुळे पुढील तीन महिन्यांत लाखो लोकांचा बळी जाऊ शकतो.
अमेरिकेचे सार्वजनिक आरोग्य शास्त्रज्ञ डॉ. एरिक फेगल डिंग यांनी ट्विट केलं की, “निर्बंध हटवल्यानंतर चीनची रुग्णालये पूर्णपणे ओव्हरलोड झाली आहेत. पुढील तीन महिन्यांत हा संसर्ग जगातील 10 टक्के लोकसंख्येला आणि चीनच्या 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला घेरेल. यामुळे लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. ही फक्त सुरुवात आहे.”
Coronavirus : फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर जरा थांबा! पर्यटनस्थळी वाढतोय धोका
त्यांनी इशारा दिला की, “तीन वर्षांपूर्वी वुहानने आपल्याला धडा शिकवला. जागतिक स्तरावर 2022-2023 च्या या लाटेचा प्रभाव कमी नसेल. Feigl-Ding ने अनेक बातम्या शेअर केल्या आहेत की CVS आणि वालग्रीन्स सारख्या मोठ्या यूएस औषध कंपन्या उच्च मागणीमुळे वेदना आणि तापाच्या औषधांच्या विक्रीवर मर्यादा घालत आहेत”. ते पुढे म्हणाले, “चीनमध्ये जे काही चालले आहे ते केवळ चीनपुरते मर्यादित राहणार नाही. हे आपण यापूर्वी पाहिलं आहे.”
एका निवेदनात वॉलग्रीन्स कंपनीने सांगितलं की, वाढती मागणी आणि औषधं साठवून ठेवण्याच्या घटना टाळण्यासाठी आम्ही औषधांच्या विक्रीसाठी नियम निश्चित केले आहेत. ज्या अंतर्गत एखादी व्यक्ती एका वेळी फक्त सहा डोस खरेदी करू शकते. त्याच वेळी, CVS ने सांगितले की ते मुलांच्या वेदना कमी करणारी औषधे प्रति ग्राहक दोन युनिट्सपर्यंत मर्यादित ठेवणार आहेत.
शेवटी नको तेच झालं! चीनमधून परतलेला तरुण कोविड पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाची तयारी सुरू
युरोप, अमेरिका, कॅनडा आणि चीनसारख्या देशांमध्ये औषधांच्या तुटवड्याबद्दल बोलताना फीगल डिंग म्हणाले की, यामुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. ते म्हणाले की, ताप आणि सर्दीमध्ये वापरल्या जाणार्या इबुप्रोफेन या अत्यंत सामान्य औषधाची चीनमध्ये तीव्र टंचाई आहे. त्यामुळे लोक आता थेट इबुप्रोफेन कंपन्यांच्या कारखान्यांकडे जात आहेत आणि औषधांचा साठा संपल्यामुळे ते घेण्यासाठी लांबलचक रांगेत उभे आहेत. चीनमध्ये असे घडल्यास उर्वरित जगालाही या समस्येला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.
त्यांनी दुसर्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पाश्चिमात्य देशांतील लोक असा विचार करत आहेत की फक्त ताप आणि अँटिबायोटिक्सचा अभाव आहे. पण काही दिवस थांबा, मग बघा की चीन निर्यातीसाठी उत्पादन मर्यादित करेल. येथे लोक औषधाच्या कारखान्यात जाऊन इबुप्रोफेन विकत घेत आहेत कारण मेडिकलमधील साठा पूर्णपणे संपला आहे.”
काही लोकांनी एरिक फीगलच्या पोस्टवर नाराजीही व्यक्त केली आणि त्यांना सल्ला दिला की लोकांना घाबरू नका. एका यूजरने लिहिलं की, “भीती पसरवणाऱ्या मास्टरने तर्क आणि स्रोतांशिवाय असे दावे करू नयेत.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.