स्वत: च्या मृत्यूचा बनाव करत प्रेयसीसोबत पळाला, पण पुढे जे घडलं ते भयानक

पुणे, 29 डिसेंबर : पुणे जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दरम्यान खून मारामाऱ्या या घटनांमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान आळंदी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आळंदीच्या चऱ्होली बुद्रुकमध्ये मित्राची हत्या करून स्वत:लाही संपवल्याचा बनाव केल्याची घटना समोर आली आहे. हा सगळा बनाव फक्त प्रेयसीसाठी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुभाष थोरवे असे त्या मुलाचे नाव आहे.
सुभाष थोरवे या प्रियकराने रवींद्र घेनंद या आपल्या जवळच्या मित्राचीच हत्या केली असल्याची माहिती आहे. दरम्यान यामध्ये सुभाषचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ही माहिती कुटुंबियांना समजताच त्याचा अपघातात मृत्यू झाला असे समजून कुटुंबियांनी दशक्रिया विधी घातला. तर संतोष हा प्रेयसीसोबत जेजुरीत पळून गेला होता.
हे ही वाचा : प्रेमविवाहानंतर पहिल्याच रात्री समोर आलं पत्नीचं धक्कादायक सत्य, नवरदेवाची थेट पोलिसांत धाव
स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचून मित्राची हत्या केल्याची माहिती प्रेयसीला देण्यात आली त्यामुळं घाबरलेली प्रेयसीने घरी जाण्याचा तगादा लावला. सोबत असलेले पैसे संपल्याने तो अत्यंत बिकट अवस्थेत होता. तो चुलत बहिणीकडे पायी जात असताना त्याला चोर समजून तेथील स्थानिक नागरिकांनी मारहाण देखील केली.
संतोष थोरवेने स्वतः नाव सांगताच नागरिकांनी चुलत बहिणीला बोलावलं आणि संतोष थोरवेला बघताच बहीण बेशुद्ध पडली. स्थानिकांनी आळंदी पोलिसांना बोलावून संतोषला ताब्यात घेतलं आणि स्वतः चा मृत्यूचा बनाव केला असल्याचे खरी माहिती समोर आली.
पुण्यात गुंडगिरी वाढतेय
पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली येथील बैलगाडा घाटात किरकोळ कारणावरून एका बावीस वर्षीय तरुणाची कोयता आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात चार आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचा मित्र सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे हे चिखली येथील बैलगाडा शर्यत घाटातील महादेवाच्या मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. यापूर्वी सोन्या शिंदे याचा आरोपी आदित्य पाटोळे याच्यासोबत काही कारणांमुळे वाद झाला होता.
हे ही वाचा : मजुरीसाठी घरातून बाहेर पडला पण पुन्हा घरी परतलाच नाही; धक्कादायक घटनेनं औरंगाबाद हादरलं!
जुन्या भांडणाच्या कारणातून सोन्या आणि त्याचा मित्र जिथे गप्पा मारत होते तिथे आरोपी आदित्य पाटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे, आणि लालू यादव हे आले. त्यांनी काही कळण्याच्या आतच सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे याच्यावर कोयत्याने व तलवारीने सपासप वार केले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.