'स्वतःचे काय?', भाजपवर चोरीचा आरोप करत संजय राऊतांचा 'रोखठोक' सवाल

'स्वतःचे-काय?',-भाजपवर-चोरीचा-आरोप-करत-संजय-राऊतांचा-'रोखठोक'-सवाल

Sanjay Raut asked to bjp and rss, says what your contribution in indian freedom movement

‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी कुटुंबानं (Gandhi Family) आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. मात्र स्वातंत्र्यासाठी तुमचा कुत्राही मेला नाही,’ काँग्रेस अध्यक्ष (congress president) मल्लिकार्जून खरगे (mallikarjun kharge) यांच्या विधानावर भाजप (bjp) संताप व्यक्त केला. याच गदारोळावरून संजय राऊतांनीही (Sanjay Raut) भाजपला खिंडीत गाठलंय. संजय राऊतांनी तर भाजपवर महापुरुषांच्या चोरीचा आरोप केलाय.

स्वातंत्र्य लढ्यातील भाजप आणि संघाच्या (bjp and Rss) योगदानावरून काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपला डिवचलं. त्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं दिसलं. मल्लिकार्जून खरगे यांच्याच विधानावर बोट ठेवत संजय राऊतांनी रोखठोकमधून (Sanjay Raut Rokhthok) भाजपला सुनावलं आहे.

संजय राऊत रोखठोकमध्ये (Rokhthok) म्हणतात, “खरगे यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्ष संतापला आहे. पण चिडून, संतापून, आदळआपट करून काय उपयोग? खरगे यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचा प्रतिवाद भारतीय जनता पक्षाने करायला हवा, पण खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पक्षाकडे नाही.”

स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात भाजप-संघ नामोनिशाण आहे काय? -संजय राऊत

“स्वातंत्र्य लढ्यात, नागरी हक्कांच्या लढ्यात माणसांची बलिदानं होतात. काँग्रेस पक्षानं स्वातंत्र्याच्या लढ्याची ठिणगी टाकली. टिळकांपासून गांधींपर्यंत, नेहरूंपासून सरदार पटेल, सुभाषचंद्र बोसपर्यंत प्रत्येकाने त्यात आयुष्याच्या समिधा टाकल्या. या स्वातंत्र लढ्याच्या इतिहासात भाजप-संघ वगैरेंचे कोठे नामोनिशाण आहे काय? खरगे म्हणतात, निदान स्वातंत्र्य लढ्यातील तुमचा कुत्रा तरी दाखवा,” असं म्हणत राऊतांनी भाजप-संघाला डिवचलं आहे.

संजय राऊतांचा भाजपवर चोरीचा आरोप, नक्की काय म्हणालेत?

संजय राऊतांनी भाजपवर महापुरुषांच्या चोरीचाच आरोप केलाय. राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, “भारतीय जनता पक्षाकडे स्वतःची प्रेरणादायी प्रतिकं नाहीत. त्यामुळे सरदार पटेल, नेताजी बोस या मूळच्या काँग्रेस लढवय्यांची चोरी करावी लागली. डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.”

“काँग्रेस पक्षाने लोकमान्य टिळक, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना कशी वागणूक दिली हे देशातील जनतेस माहीत आहे. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिक हे काँग्रेस पक्षाचेच होते, हा दावा फसवा आहे, असे प्रल्हाद जोशी या भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने सांगितले ते एकवेळ मान्य करू. पण स्वातंत्र्य लढय़ातील तुमचे नक्की योगदान काय? हा प्रश्न अधांतरीच राहतो. भाजप किंवा संघ परिवाराच्या किती लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात कठोर कारावास भोगला ते सांगा,” असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवलंय.

अमृता फडणवीसांचं विधान, राऊतांचा भाजपला सवाल

“अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे व त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले, ‘आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत!’ फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात व एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय?,” असा सवाल संजय राऊतांनी भाजपला केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *