सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून काढलं म्हणून अॅडमिनची जीभच कापली,पुण्यातील घटना

पुणे, 03 जानेवारी : सोसायटीमध्ये वाद काही नवा नाही. पण सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अॅडमिनला बेदम मारहाण करत जीभ कापल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीत हा प्रकार घडला आहे. या भागातील ओम हाईट्स या सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. हा प्रकार 28 नोव्हेंबर रोजी घडला आहे. सोसायटीत राहणाऱ्या एका रहिवाशाने ‘ओम हाईट्स ऑपरेशन’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये सोसायटीमधील सर्व सदस्य होते. या ग्रुपचा पीडित व्यक्ती अॅडमिन होता.
(सातारा : उधारीचे पैसे देऊ शकत नव्हता म्हणून पत्नीला म्हणाला…, मित्रानेही साधला तो डाव)
सोसायटीमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमधून काही जणांना रिमूव्ह केलं होतं. त्यामुळे तक्रारदार महिलेच्या पती आणि सोसायटीतील रहिवाशांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. पाच जणांनी ग्रुप अॅडमिनला बेदम मारहाण केली. मारहाणीत अॅडमिनची जीभ कापली गेली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते जखमी झाले आहेत.
(हेही वाचा – तरुणी प्रेमात झाली आंधळी, बॉयफ्रेंडसाठी स्वत:च्या आईसोबत केलं भयानक कांड)
याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.