सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्या प्रकरणी एकजण पोलिसांच्या ताब्यात; सूत्रांची माहिती

सोलापूर

 

सोलापूर :(रतन डोळे )
भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. जयसिद्धेश्वर यांच्या जातीच्या दाखल्या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. खासदारांचा बनावट जातीचा दाखला तयार केल्याच्या संशयावरून शिवसिद्ध बुळा यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान,सोलापूर जात वैधता पडताळणी समितीने खासदारांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने अक्कलकोट तहसीलदारांना बोगस दाखला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याच प्रकरणी शिवसिध्द बुळा याचा बनावट दाखला तयार करण्यात हात? असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. यामुळेचं सोलापूर शहर गुन्हे शाखेने बुळा यास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *