सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक; कर्नाटकच्या बसला फासले काळं | पुढारी


सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील एसटी बसेस आणि ट्रकवर कर्नाटकमध्ये दगडफेक करून वाद निर्माण करणाऱ्या कर्नाटक सरकारचा प्रहार जनशक्ती पक्षाकडून बसला काळं फासत निषेध करण्यात आला. कर्नाटकच्या बसला आडवून बसवर शाही फेक करत कर्नाटक एसटीला काळं फासण्याचे काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला काळं फासत कर्नाटक सरकारचा ही याप्रसंगी निषेध करण्यात आला.
या आंदोलन प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी आक्रमक होत कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटक वेदिका या संघटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आज आम्ही कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिमेला काळं फासत आहोत येत्या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद संपला नाही. तर थेट कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा तोंडाला काळं फासू, असा इशाराही यावेळी अजित कुलकर्णी यांनी दिला.
यावेळी बोलताना प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख म्हणाले की, कर्नाटकातील सरकारी गाड्या तसेच आमदार खासदार मंत्र्यांचे गाड्या प्रहार फोडल्याशिवाय राहणार नाही. तसेच वेदिका संघटनेने महाराष्ट्राला भीती दाखवण्याचे काम करू नये. महाराष्ट्र कधीही झुकत नाही आणि झुकणार नाही. महाराष्ट्राने विचार केला तर दिल्लीला झुकवायची ताकद महाराष्ट्राच्या मनगटीत आहे, हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे. याप्रसंगी शहर कार्यकारी प्रमुख खालीद मणियार, शहर उपप्रमुख माजिद पटेल, करमाळा तालुका प्रमुख संदीप तळेकर, आकीब नाईकवाडी आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का?
- औरंगाबाद : ४५ हजारांची लाच घेताना विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामविकास अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
- IND VS BAN 2nd ODI : जखमी रोहित शर्माची झुंज अपयशी; बांगलादेशचा भारतावर ५ धावांनी विजय
- Eden Hazard Retirement : विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर बेल्जियमच्या कर्णधाराने घेतली निवृत्ती
Back to top button