सेटवर अपघात होताच देवदत्त नागेनं घेतला जीव माझा गुंतला मालिकेतून ब्रेक

सेटवर-अपघात-होताच-देवदत्त-नागेनं-घेतला-जीव-माझा-गुंतला-मालिकेतून-ब्रेक

मुंबई, 19डिसेंबर: ‘जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. मराठी टेलिव्हिजन गाजवल्यानंतर देवदत्तनं बॉलिवूडमध्येही आपली नवी ओळख निर्माण केली. जय मल्हारनंतर देवदत्तनं पौराणिक मालिकांचा लेबल हटवत नव्या विषयाची मालिका केली. ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेनंतर देवदत्त नागे अनेक महिन्यांनी टेलिव्हिजनवर परतला आहे. अभिनेता सध्या कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेत देवदत्त निगेटीव्ह भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांआधीच देवदत्त नागेनं मालिकेत एंट्री घेतली होती.  पण आता काही दिवसातच त्याला मालिकेतून ब्रेक घ्यावा लागतोय. मालिकेतून ब्रेक घेण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

जीव माझा गुंतला मालिकेत देवदत्त नागे तुषार देसाई नावाची व्यक्तीरेखा साकारत आहे. अंतरा आणि मल्हारच्या आयुष्यात अडथळा आणण्याचं काम तुषार करताना दिसत आहे.  त्यामुळे देवदत्त मालिकेच्या शुटींगमध्ये बिझी असतो. देवदत्तला पुन्हा टेलिव्हिजनवर पाहून त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पण मालिकेतून ब्रेक घेतल्याचं स्वत: देवदत्तनं सांगितलं आहे.

हेही वाचा – Riteish Genelia Exclusive : रितेशची स्वप्न जिनिलीयानं कशी पूर्ण केली? आयडियल कपलच्या नात्यातील सिक्रेट आलं समोर

जीव माझा गुंतला मालिकेच्या शुटींगवेळी देवदत्तला दुखापत झाली आहे. त्याच्या डोळ्याला जबरदस्त मार लागला असून डोळ्याल गंभीर दुखापत होता होता वाचली. देवदत्तनं फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या डाव्या डोळ्याला जखम झाली आहे. जखमेमुळे डाव्या डोळ्याल सुज आली आहे. या दुखापतीमुळे देवदत्तनं काही दिवसांसाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

देवदत्तनं डोळ्याला दुखापत झालेला फोटो शेअर करत म्हटलंय, ‘आता काही दिवसांसाठी आराम. जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवर शुटींगवेळी छोटी दुखापत झाली आहे. देवाच्या कृपेनं माझा डोळा थोडक्यात वाचला’. त्यामुळे आता देवदत्त पुढचे काही दिवस जीव माझा गुंतला मालिकेत दिसणार नाहीये.  देवदत्तच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

देवदत्तच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर देवदत्तनं स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ मालिकेतून पदार्पण केलं. त्यानं साकारलेली भैया साहेब ही भूमिका खूप गाजली. त्यानंतर झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही प्राइम टाइम मालिका त्याला मिळाली. मालिकेतील देवदत्तनं साकारलेला खंडोबा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर देवदत्तनं ‘तान्हाजी’ सिनेमा बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर आता ‘आदिपुरूष’ या सिनेमात तो दिसणार आहे. आदिपुरूष 2023मध्ये रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *