सेटवरून हा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तुनिषा शर्माने आत्महत्येपूर्वी म्हटले होते की…

सेटवरून-हा-व्हिडीओ-आणि-फोटो-शेअर-करत-तुनिषा-शर्माने-आत्महत्येपूर्वी-म्हटले-होते-की…

सेटवरून हा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तुनिषा शर्माने आत्महत्येपूर्वी म्हटले होते की…

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Updated on: Dec 24, 2022 | 10:52 PM

या प्रकरणात आता तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझानला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.

सेटवरून हा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तुनिषा शर्माने आत्महत्येपूर्वी म्हटले होते की...

मुंबई : तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. अवघ्या वीस वर्षांमध्ये तुनिषा हिने जीवनयात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे तिने मालिकेच्या सेटवरच फाशी घेतल्याने आता अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबईतील वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. टी ब्रेकमध्ये तुनिषा शर्मा ही बाथरूममध्ये गेली होती. परंतू बराच वेळ झाल्यानंतरही ती बाहेर येत नसल्यामुळे दरवाजा तोडल्यानंतर तुनिषा शर्मा हिने फाशी घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणात आता तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझानला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.

तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. बालकलाकार म्हणून तुनिषा हिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. अगदी कमी वेळामध्ये तुनिषा शर्मा हिने आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप प्रेक्षकांवर सोडली.

tunisha sharma

तुनिषा शर्माची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त होती. इतकेच नाहीतर ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहिची. आत्महत्येच्या सहा तास अगोदरच तिने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती.

इंस्टाग्रामवर तिने एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती स्क्रीप्ट वाचताना दिसत आहे. इतकेच नाहीतर तिने हा फोटो शेअर करताना लिहिले की, जे लोक त्यांच्या उत्कटतेने चालतात ते कधीही थांबत नाहीत.

tunisha sharma

इंस्टाग्राम स्टोरीवर देखील तिने शूटिंगच्या अगोदरचा सेटवरील एक व्हिडीओही शेअर केला होता. यामध्ये तिचा मेकअप केला जात असल्याचे दिसत होते. आता चाहते तुनिषा शर्माच्या इंस्टाग्राम पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

तुनिषा शर्मा हिने आत्महत्या नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी केली, याचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र, तुनिषाच्या अशाप्रकारे जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तुनिषाच्या नातेवाईकांनी तिचा बॉयफ्रेंड शिझानवर गंभीर आरोप केले आहेत.

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *