सुषमा अंधारे यांनी संभाजी भिडे यांच्या बातमीचं कात्रण वाचून दाखवलं, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक आक्षेपाला प्रत्युत्तर, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

भाजपनं बाहेर काढलेले आपले व्हिडीओ हे 13 वर्षांपूर्वीचे असल्याचा दावाही अंधारेंनी केलाय. 13 वर्षांपूर्वीची गोष्ट भाजपला आत्ताच का आठवली? असा सवालही अंधारेंनी केलाय.
मुंबई : सुषमा अंधारेंच्या जुन्या वक्तव्यांवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता अंधारेंनीही फडणवीसांच्या प्रत्येक आक्षेपाला प्रत्युत्तर दिलंय. काल विधानसभेत सुषमा अंधारेंच्या जुन्या वक्तव्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली. पण आता अंधारेंनीही फडणवीसांना टार्गेट केलंय. मी पळून जाणारी नाही. मी गप्प बसणारी नाही असं प्रत्युत्तर अंधारेंनी फडणवीसांना दिलंय.
भाजपनं बाहेर काढलेले आपले व्हिडीओ हे 13 वर्षांपूर्वीचे असल्याचा दावाही अंधारेंनी केलाय. 13 वर्षांपूर्वीची गोष्ट भाजपला आत्ताच का आठवली? असा सवालही अंधारेंनी केलाय.
देवेंद्र फडणवीसांनी अंधारेंची जुनी वक्तव्ये वाचून दाखवल्यानंतर अंधारेंनीही अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या कार्यक्रमावरुन टीका केली.
सुषमा अंधारेंनी कालच्या सभेत संभाजी भिडेंच्या बातमीचं कात्रण वाचून दाखवलं. माऊली आणि तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ आहे असं म्हणणाऱ्या भिडेंचा निषेध करणार का? असा सवालही अंधारेंनी विचारलाय.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकातला एक उतारा वाचूनही अंधारेंनी फडणवीसांना सवाल विचारले.
हिंदू देवदेवतांच्या अवमानाबाबतचं भाजप नेते नरेश अग्रवाल यांचं जुनं वक्तव्यही अंधारेंनी भर सभेत दाखवलं.
सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्रभर फिरतायत. भाजप आणि शिंदे गटावर टीका करतायत. आता सुषमा अंधारेंनी लाव रे तो व्हिडीओची मालिकाच सुरु केलीय.