सुशांत सिंह राजपूत याच्या केसमध्ये खुलासा होताच, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रिया चक्रवर्ती म्हणाली

सुशांत-सिंह-राजपूत-याच्या-केसमध्ये-खुलासा-होताच,-सोशल-मीडियावर-पोस्ट-शेअर-करत-रिया-चक्रवर्ती-म्हणाली

जेंव्हाही सुशांतच्या निधनाचा विषय निघतो, त्यावेळी सुशांतचे चाहते हे बाॅलिवूडला टार्गेट करतात.

मुंबई : बाॅलिवूडच्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या निधनानंतर राज्यामध्ये मोठे राजकारण रंगले. यादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले. याच प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला जेलमध्ये देखील जावे लागले. जेंव्हाही सुशांतच्या निधनाचा विषय निघतो, त्यावेळी सुशांतचे चाहते हे बाॅलिवूडला टार्गेट करतात.

2020 मध्ये सुशांतचे पोस्टमार्टम हे मुंबईतील कूपर रुग्णालयात करण्यात आले होते. त्यावेळी असा अहवाल देण्यात आला होता की, सुशांतच्या शरीरावर कोणत्याच जखमा आढळून आल्या नाहीत.

याच प्रकरणात आता पोस्टमार्टम टीमच्या एका कर्मचाऱ्याने अत्यंत मोठा दावा केला असून ज्यावेळी सुशांतला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेंव्हा त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.

या कर्मचाऱ्याच्या दाव्यानंतर आता परत एकदा चर्चांना उधाण झाले असून सोशल मीडियावर चाहते सुशांतचा खून करण्यात आल्याचा दावा करत असून न्याय मागत आहेत.

हे सर्व सुरू असतानाच आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हिला ट्रोल केले जात होते.

रिया चक्रवर्ती हिने पोस्टमध्ये म्हटले की, तुम्ही आगीतून चालत गेलात आणि पुरातून वाचलात, म्हणून पुढच्या वेळी तुमच्या सामर्थ्यावर शंका आल्यास हे लक्षात ठेवा…आता रियाची हिच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *