सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राहुल शेवाळेंनी लोकसभेत आदित्य ठाकरेंचा केला उल्लेख

दिल्ली, 21 डिसेंबर : अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून बाळासाहेबांची शिवसेना पक्ष नेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांचा नावाचा उल्लेखच शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. त्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.
लोकसभेत आज ड्रग विधेयकाच्या चर्चेदरम्यान खासदार राहुल शेवाळे यांनी बाजू मांडली. यावेळी राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य – उद्धव यांचे घेतले आहे.
(अन् सभागृहात भुजबळांनी मफलर पुढे करून भीक मागितली, फडणवीसांनी काढले प्रबोधनकारांचे पुस्तक!)
सुशांत आणि दिशा सालियान यांच्या फोनमध्ये काय बोलणं झालं होतं? तिचा लॅपटॉप आणि मोबाईल काढून का घेतला? रिया चक्रवर्तीचा मोबाईल तपासला का, तिच्या मोबाईलमध्ये AU हा नंबर सेव्ह होता. त्यावर 44 फोन आले होते, AU ला अनन्या उद्धव असं सांगितलं आहे. पण बिहार पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा आदित्य आणि उद्धव ठाकरे असं नाव समोर आलं होतं, असा दावाच शेवाळे यांनी केला आहे.
मुंबईमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा कारवाई करते तेव्हा हायप्रोफाईल प्रकरणातच हस्तक्षेप करत असते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी 3 स्तरावर चौकशी झाली होती. सीबीआय, मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांनी चौकशी केली होती. पण, यामध्ये अजूनही काही प्रश्न आहे. सुशांत राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयचा तपास कुठपर्यंत आला आहे? अशी विचारणा राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
(शाहरुखची कातडी सोलेन; पठाण सिनेमाच्या वादात संत परमहंस यांची धमकी)
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपुत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने मोठा खुलासा केला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणाचा तपास करून सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला आहे.
विशेष म्हणजे, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलाने दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा वारंवार आरोप केला होता. एवढंच नाहीतर तिच्यावर बलात्कार झाल्याचा दावाही केला होता. मात्र सीबीआयच्या या निष्कर्षानंतर राणे पितापुत्रांच्या या आरोपांना आता तरी पूर्णविराम मिळणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
T7lorxXv
DolO3U6v
2jSNIEdX
ZnI55hHJ
pEcvjg1i
wtrryjlF
jZT63U5I
IrvVVTzc
YrehTb9B
tw7Pf0cj