सुप्रिया सुळेंना अमित शाहांवर विश्वास, पण फडणवीसांकडून मागितलं स्पष्टीकरण!

सुप्रिया-सुळेंना-अमित-शाहांवर-विश्वास,-पण-फडणवीसांकडून-मागितलं-स्पष्टीकरण!

मुंबई, 12 डिसेंबर : महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गाड्या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. महिला सुरक्षा ही प्राथमिक असली पाहिजे, ही गोष्ट अतिशय धक्कादायक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘निर्भया फंड प्रत्येक राज्यात येतो. भारतातील प्रत्येक नागरिक हा व्हीआयपीच आहे. गृहमंत्र्यांनी याची चौकशी केली पाहिजे. अद्याप याबाबत प्रतिक्रिया नाही, हे धक्कादायक आहे. हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. गृहमंत्र्यांनी याबाबत स्वत: स्पष्टीकरण द्यावं,’ अशी मागणी सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

‘मी याआधी देशाच्या गृहमंत्र्यांशी बोलले आहे, मला विश्वास आहे ते यातून योग्य मार्ग काढतील. माझा त्यांच्यावर विश्वास आहे,’ असं सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत म्हणाल्या. तसंच राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना मिळालेल्या जामिनाबाबतही त्यांनी आनंद व्यक्त केला. मी कोर्टाचे आभार मानते, हा दिवस आनंदाचा आणि दिलासादायक आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.

‘पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते पण त्यांनी…’, सुप्रिया सुळेंचा टोला

काय आहे वाद?

शिंदे गटाच्या आमदारांना निर्भया फंडमधून Y+ सुरक्षा देण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या डीजींना याबाबत पत्र लिहिण्यात आलं आहे. आमदारांना सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या गाड्या परत घेण्याची मागणी या पत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. निर्भया फंडाची स्थापना राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी खर्च करायला झाली होती, हा प्रकार म्हणजे महिला सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही हा प्रकार लाजिरवाणा असल्याचं म्हणलं आहे. निर्भया स्क्वाड का बनवण्यात आला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या आई-बहिणी सुरक्षित राहाव्या, हा निर्भया स्क्वाडचा उद्देश होता, यातून त्यांना सुरक्षा दिली जात होती, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

‘हे कितपत शहाणपणाचं’, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सल्लावजा टोला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *