पुणे (,रतन डोळे)
फिर्यादी कैलास भिकाजी सातपुते रा. टेंभूर्णी ता. माढा हे त्यांच्या दोन सहकारी मित्रा सोबत दि. 15/01/2021 रोजी मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. सदरचे काम संपवून ते स्वतःची चार चाकी वाहन क्र. MH 45 AL 0019 वेनू या चार चाकी वाहनातून रात्री 9:30 वाजणेच्या सुमारास यवत गावचे हद्दीत पुणे सोलापूर या महामार्गावर श्री. महेश मांजरेकर हे यांची चार चाकी MH01 DT 1900 ही कार स्वतः चालवीत असताना सदर फिर्यादीच्या वाहनाला ओव्हर टेक करून सोलापूर च्या दिशेने चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करून अचानक पणे ब्रेक दाबून फिर्यादीच्या वाहना समोर थांबविले यामुळे फिर्यादीच्या वाहन क्र. MH 45 AL 0019 या फिर्यादीच्या ताब्यातील चारचाकी वाहनाचा मांजरेकर यांच्या चारचाकी वाहनाला धक्का लागला,त्यावेळी श्री.महेश मांजरेकर यांनी फिर्यादीस ऊर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केली. म्हणून सदरची तक्रार फिर्यादीने संबंधीत यवत पोलिस स्टेशनला दाखल केली परंतु यवत पोलिसांनी सदर सिने अभिनेता श्री.महेश मांजरेकर यांचेवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही म्हणून फिर्यादीने दौंड येथील न्यायालयामध्ये धाव घेतली व श्री.महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध दौंड न्यायालया मध्ये फौजदारी खटला दखल केला सदर प्रकरणामध्ये फिर्यादी तर्फे Ad.पी.डी.खंडागळे, Ad.हरिश्चंद्र भाऊसाहेब कांबळे (माढा) Ad.रवींद्र संसारे ,Ad.आर एम शेळके यांनी काम पाहिले.