सिद्धिविनायक मंदीर प्रकरणी मनसेनं आदेश बांदेकरांना पुन्हा घेरलं; आता थेट आव्हान

मुंबई, 26 डिसेंबर : राज्यात मागच्या काही दिवसांत मनसेकडून ठाकरे गटाच्या नेत्यांवर आरोप होत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सिद्धीविनायक मंदीरात घोटाळा झाल्याचा आरोप आदेश बांदेकर यांच्यावर केला होता. सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढते असते परंतु यावर्षी ती निघाली नाही त्याला आदेश बांदेकर जबाबदार असल्याचे मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी आरोप केला आहे. या डायरीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा असा बांदेकर यांचा अट्टाहास असल्याची माहिती आहे. याला काही विश्वस्तांचा विरोध असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि यांच्यासोबत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी आदेश बांदेकरांवर जोरदार टिका केली आहे.
यशवंत किल्लेदार यांचे ट्विट –
मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आता आदेश बांदेकर यांना पत्रकार परिषद घेण्याचे आव्हान दिले आहे. पत्रकार परिषद घ्यावी आणि अविस्मरणीय बक्षीस बांदेकरांनी घेऊन जावे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
यशवंत किल्लेदार काय म्हणाले,
गेल्या महिन्याभरात काही अंतरावर 2 पत्रकार परिषद, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निवेदनासह भेट, थेट सिद्धिविनायक मंदिरात साकडं घातलं तरी बांदेकर काहीच बोलत नाहीत. त्यांनी पत्रकार परिषद घ्यावीच आणि एक अविस्मणीय बक्षिस घेऊन जावे ते जमत नसेल तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे.
बांदेकर का झालात अबोल?
तुमच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही सुद्धा महाराष्ट्राला धक्का बसतील, अशा गोष्टी बांदेकरांच्या बाबतीत घेऊन येणार आहोत आतुरता भावोजींच्या पत्रकार परिषदेची, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, यासोबत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनीही सिद्धिविनायक दैनंदिनी डायरी प्रकरणावर ट्विट केले आहे. माध्यम प्रतिनिधींना माहिती सांगतायत की खर्च टाळण्यासाठी दैनंदिन डायरी छापली नाही मग निविदा का काढली? इतकी गडबड करून निवादा खुली सुद्धा केली आणि हे काम स्नेहा प्रिन्ट्स सर्व्हिसला दिले.
इतके होऊन सुद्धा फक्त उद्धव ठाकरे यांच्या फोटोसाठी या माणसाने डायरी प्रिंटींग थांबवून ठेवली आहे. या खोटारड्या माणसाला या पवित्र देवस्थानाच्या मंडळ अध्यक्ष पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. यावर बांदेकरांनी उलट प्रतिक्रिया द्यावीच, मी याबाबतीत अजुन कागदपत्रे जाहीर करतो. खोटारडे आदेश बांदेकर विरपन्ना गँगचा मेंबर, असे ट्विट करत त्यांनी आदेश बांदेकरांवर टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.