सिद्धिविनायक मंदीर प्रकरणी ठाकरे गटाचे आदेश बांदेकर अडचणीत, मनसेकडून गंभीर आरोप

मुंबई, 25 डिसेंबर : राज्यात महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून ठाकरे गटावर मनसे आणि भाजपकडून जोरदार प्रहार होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांत मनसेकडून ठाकरे गटाच्या नेत्यांवर आरोप होत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सिद्धीविनायक मंदीरात घोटाळा झाल्याचा आरोप आदेश बांदेकर यांच्यावर केला होता. दरम्यान पुन्हा त्यांच्यावर मनसे नेते मनोज चव्हाण यांनी आरोप केला आहे.
सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढते असते परंतु यावर्षी ती निघाली नाही त्याला आदेश बांदेकर जबाबदार असल्याचे मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी आरोप केला आहे. या डायरीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा असा बांदेकर यांचा अट्टाहास असल्याची माहिती आहे. याला काही विश्वस्तांचा विरोध असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
हे ही वाचा : Corona Update Maharashtra : ख्रिसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजा करा, फक्त..; कोरोनाबाबत आरोग्य मंत्र्यांचं महत्त्वाचं विधान
दरम्यान चव्हाण पुढे म्हणाले की, बांदेकर सिद्धिविनायक न्यास मंदीराला प्रायव्हेट कंपनी समजत आहेत. या प्रकरणावरून आदेश बांदेकर यांची चौकशी करावी. याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती मनोज चव्हाण यांनी केली.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचीही टीका
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सिद्धीविनायक ट्रस्टच्या नावाखाली बांदेकर यांनी पैसे खाल्याचे किल्लेदार यांचे म्हणणे आहे, यावेळी किल्लेदार म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार असताना ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. दरम्यान यावेळी या शिवभोजन थाळीचे काम सिद्धिविनायक न्यास मंदीराला आले होते.
मंदीर प्रशासन ही थाळी देऊ शकले असते पण बांदेकरांनी याला फक्त अर्थसहाय्य देतो असे पत्र दिले. बांदेकरांनी फक्त उद्धव ठाकरे यांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी आणि कॅबिनेट दर्जा मिळण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप किल्लेदार यांनी केला.
किल्लेदार पुढे म्हणाले की, बांदेकरांनी याच्यासाठी वेळ न घालवता 19 जानेवारीला ठराव केला आणि 28 जानेवारीला वेगळे अकाउंट काढले. दरम्यान हा कोरोनाचा काळ होता या काळात त्यांनी हा प्रकार केल्याचे किल्लेदार म्हणाले. कार्यकारी अधिकारी आणि बांदेकर यांनी परस्पर निर्णय घेतला यावर कार्यकारी अधिकारी यांचा रिमार्क आहे.
हे ही वाचा : भारत जोडो यात्रेमुळे कोरोना पसरण्याची भीती, भाजप नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
यामध्ये बांदेकरांनी सिद्धीविनायक मंदीर ट्रस्टचा पाच कोटी फंड पाठवला नंतर यांनी पत्र लिहले की तरतुदी करून घेण्यास सांगितलं कारण 25 हजार पेक्षा पैसे पाठवतां येत नाही त्यासाठी सरकारचा ठराव लागतो. दरम्यान या निर्णया विरोधात काही विश्वस्तानी कोर्टात शपथपत्र दिले आहे. की या गोष्टीशी आमचा संबंध नाही यामुळे बांदेकरांनी मंदीर प्रशासनातील कोणालाही विश्वासात न घेता हा प्रकार केल्याचे किल्लेदार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.