सावधान … म्हणून गडकिल्ल्यांवर, धरणावर, निसर्गाच्या सानिध्यात जाताना परफ्यूमचा वापर टाळा

सावधान-…-म्हणून-गडकिल्ल्यांवर,-धरणावर,-निसर्गाच्या-सानिध्यात-जाताना-परफ्यूमचा-वापर-टाळा

मात्र या ठिकाणांवर अनुभव आल्यानंतर तुम्हाला परफ्यूम मारला आहे का, हे विचारलं जातं.कारण मधमाशा या सुगंधासाठी आणि त्यातून मध शोधण्यासाठी लांबपर्यंत प्रवास करतात.

मुंबई : वर्षसंपत आलं आहे, या निमित्ताने काही जण निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करण्याच्या विचारात असतात. शहरीकरण वाढल्यानंतर शहरातील नागरीक मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या सानिध्यात जातात. गडकिल्ले, धरणं किंवा हिरवीगर्द झाडी यात फिरण्याची मजा वेगळीच असते.निसर्गाचं आकर्षण सर्वांनाच असतं, यात फिरण्यात एक वेगळा आनंद आणि शांती मिळते असं म्हणतात. पण अशा ठिकाणी जाताना काळजी देखील घेतली पाहिजे, अगदी शूजपासून ते कपड्यांपर्यंत सर्व प्रकारची काळजी पर्यटक घेताना दिसतात. पण आणखी एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.

कारण धरणावर जेव्हा तुम्ही धरण पाहायला गेलात, तर तुम्हाला तेथील सुरक्षा रक्षक हे कटाक्षाने विचारतात, तुम्ही परफ्यूम मारलाय का? किंवा डार्क बॉडी स्प्रे मारलाय का ? कारण धरणाला लागून मोठमोठी मधमाशांची पोळं असतात.तशीच परिस्थिती गडकिल्ल्यांवर देखील असते किंवा लेण्याच्या आजूबाजूला देखील अशीच परिस्थिती असते, तेथे देखील दगडांवर मधमाशांची पोळं असतात.

आता परफ्यूम मारलेले पर्यटक आणि मधमाशा यांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पुणे जिल्ह्यात आणि बंगळुरु येथे घडलेल्या काही घटनांवरुन परफ्यूम मारुन गेलेल्या किंवा गर्द सुगंध असलेल्या वस्तूंना, कपडे घातलेल्यांना त्याचा अनुभव आला आहे. असं म्हणतात, हे शास्त्रीय दृष्टीकोनातून अजून सिद्ध झालेलं नाही.अशा ठिकाणी सिगरेट ओढणं देखील महागात पडू शकतं.

पाण्याच्या ठिकाणी असलेली एखादी मधमाशी आपल्याला चावली, तिला चुरगळली तर त्यातील कंप लहरी देखील इतर मधमाशांपर्यंत पोहोचत असतात. मधमाशा धोका समजून लगेच अलर्ट होतात आणि हल्ला करतात.

मात्र या ठिकाणांवर अनुभव आल्यानंतर तुम्हाला परफ्यूम मारला आहे का, हे विचारलं जातं.कारण मधमाशा या सुगंधातून आणि त्यातून मध शोधण्यासाठी लांबपर्यंत प्रवास करतात. मात्र आपण कपड्यांवर मारलेल्या अनैसर्गिक सुगंधामुळे या माशा संभ्रमात पडतात आणि हल्ला करतात असं म्हटलं जातं, पण हे किती खरं खोटं याचा काही संबंध आहे का याचं शास्त्रीय कारण अजून कुणीही शोधलेलं नसलं, तरी तुर्तास तुम्हाला धरणांवर तरी परफ्यूम मारला असेल, तर सुरक्षा रक्षक जाण्यास मज्जाव करतात.

पुणे जिल्ह्यात आणि बंगळुरुत देखील अशा घटना घडलेल्या आहेत. शाळकरी मुलांवर देखील सहली दरम्यान मधमाशांनी असे हल्ले केलेले आहेत.दुसरीकडे उन्हाळ्यात या घटना घडण्याचं प्रमाण अधिक असतं असं म्हटलं जातं.कारण त्या काळात मधमाशांची संख्या जास्त असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *