साई संस्थानाला यंदाच्या वर्षी विक्रमी दान, किती कोटीचं दान मिळालं, दानपेटीत कसला समावेश?

शिर्डी संस्थानला मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी अधिकची देणगी प्राप्त झाली आहे, देणगीमध्ये सोने आणि चांदीसह वेदशी चलनाचा सुद्धा मोठा समावेश आहे.
Image Credit source: Google
मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : राज्यातील सर्वाधिक दान जमा होणाऱ्या मंदिरांपैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानला यंदाच्या वर्षीही कोट्यवधी रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. मागील वर्षापेक्षा यंदाच्या दान रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. साईचरणी साई भक्तांनी भरभरून दान दिले आहे. साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांनी दिलेल्या दानात सोने, चांदीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. साईचरणी 2022 या वर्षात चारशे कोटीरुपयांचे दान प्राप्त झाले आहे. यामध्ये दक्षिणापेटीत 166 कोटी रुपयांचे सर्वाधिक दान प्राप्त झाले आहे. तर देणगी काउंटरवर 72 कोटी 26 लाखांचे दान प्राप्त झाले आहे. यामध्ये विशेष म्हणजे डेबिट आणि क्रेडिटद्वारे 41 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. ऑनलाईन देणगीतूनही 82 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. चेक, डीडी, मनिऑर्डरद्वारे 20 कोटी प्राप्त झाले. सोने 25 किलो 578 ग्रॅम, चांदी 326 ग्रॅम दानाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. एकूणच शिर्डी संस्थानाला मागील वर्षाच्या तुलनेत मोठी रक्कम प्राप्त झाल्याने साईदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील बड्या देवस्थानांपैकी आर्थिक स्थितीने भक्कम असलेल्या देवस्थानामध्ये शिर्डी संस्थानचा समावेश होतो.
शिर्डी संस्थानला मोठ्या प्रमाणात देणगी मिळत असल्याने शिर्डी संस्थानची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे, कोट्यवधी रुपयांचे दान यंदाच्या वर्षीही प्राप्त झाले आहे.
दानाच्या प्रकारात विदेशी दानही शिर्डी संस्थानला प्राप्त होत असते, यंदाच्या वर्षी हे दान चलन खात्याचा परवाना नूतनीकरण न झाल्याने ती देणगी कायम तशीच आहे.
दरम्यान शिर्डी संस्थानाला दिलेल्या देणगीमध्ये मध्यंतरी अंबानी कुटुंबाने देखील मोठी दिल्याचा समावेश आहे, याशिवाय गुप्त दान करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.