सलमानला भेटण्यासाठी Galaxy बाहेर झाली तोबा गर्दी; भाईजान बाहेर आला अन्…

सलमानला-भेटण्यासाठी-galaxy-बाहेर-झाली-तोबा-गर्दी;-भाईजान-बाहेर-आला-अन्…

मुंबई, 27डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं आज त्याचा 57वा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला. रात्री 12 वाजताच सलमानच्या घरी गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये बॉलिवूड कलाकारांनी जंगी सेलिब्रेशन केलं. संपूर्ण सिनेसृष्टी आणि भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पण यात त्याच्या चाहत्यांचा उत्साह काही कमी नाही. दरवर्षी सलमानच्या वाढदिवसाला सलमान घराच्या बालकनीत येऊन चाहत्यांना आपली झलक दाखवतो. त्यामुळे सलमानच्या वाढदिवसाच्या संध्याकाळी चाहते गॅलक्सीबाहेर तुफान गर्दी करतात. यावर्षीही चाहत्यांनी गॅलक्सी बाहेर गर्दी केली होती. सलमान खान बाहेर येताच चाहत्यांचा उत्साह आवरला नाही आणि त्यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पोलिसांनी जे केलं ते कॅमेरात कैद करण्यात आलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होतोय.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर सलमानचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतूरतेनं वाट पाहत होते. सलमान खान बाहेर येतोच चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. काहींनी बॅरीगेट तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच मुंबई पोलिसांनी चाहत्यांना बाबूंचा प्रसाद दिला. व्हिडीओमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करताच चाहते सैरावैरा पळताना दिसतायत.

हेही वाचा – Salman Khan: आधी मिठी मारली अन नंतर केलं किस; सलमान खानचे EX गर्लफ्रेंड संगीता बिजलानी सोबत फोटो व्हायरल

#WATCH | Mumbai: Police lathi-charge crowd gathered outside Salman Khan’s residence Galaxy apartments on his birthday. pic.twitter.com/zrB8pyaguv

— ANI (@ANI) December 27, 2022

सलमान खाननं दरवर्षी न चुकता गॅलक्सीच्या बालकनीत येईल चाहत्यांची भेट घेतो. सलमाननं त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात गॅलक्सी अपार्टमेंटच्या खाली चाहत्यांनी तुडूंब गर्दी दिसत आहे आणि सलमान त्याच्या लाखो चाहत्यांना हात दाखवत आहे. फोटोत सलमान पाठमोरा उभा आहे. सलमानची प्रचंड फॅनफॉलोविंग यामधून पुन्हा दिसून आली आहे. सलमाननं फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.

सलमानच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर सलमानचा ‘टायगर 3’, ‘किसी का भाई किसी की जान’, ‘किक 2’, ‘नो एंट्री’चा सिक्वेल या सिनेमांची चर्चा आहे. तर शाहरुखच्या पठाणमध्येही सलमान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘अंतिम’ हा सलमानचा शेवटचा सिनेमा होता. ज्यात सलमानच्या बहिणीची नवरा आयुष शर्मानं डेब्यू केला होता. तर महेश मांजरेकरांनी त्याचं दिग्दर्शक केलं होतं.

सलमानचा वाढदिवस सगळ्याचं दृष्टीनं चर्चेत ठरला. रात्री बर्थे डे पार्टीला सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीनं हजेरी लावली होती. संगीताला पाहताच सलमाननं तिला घट्ट मिठी मारली आणि कपाळावर किस केलं. सलमान आणि संगीताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सलमान संगीताला पुन्हा डेट करतोय अशा चर्चा रंगल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *