सर्वात मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने तपास केलाच नाही,

सीबीआयकडून दिशा सालियन प्रकरणावर अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलंय.
दिशा सालियन
Image Credit source: TV9 Marathi
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची दिवगंत माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावर आता सीबीआयकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. दिशा सालियन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळेलं नाही. या प्रकरणावर सीबीआयने कधीच चौकशी केलेली नाही, असं स्पष्टीकरण सीबीआयकडून देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने तपास करुन तिने आत्महत्या केल्याने मृत्यू झाल्याचं सांगितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण सीबीआयकडून या प्रकरणावर कोणताही तपास झाला नसून तसा काहीच निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, असं सांगण्यात आलंय. सीबीआयच्या या स्पष्टीकरणाने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण भाजपकडून या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय.
सीबीआयकडून दिशा सालियन प्रकरणावर अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलंय.
“दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही. हे प्रकरण सीबीआयकडे कधीही सोपवण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही”, असं सीबीआयने आपल्या अधिकृत जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
दिशा सालीयन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
(सविस्तर बातमी लवकरच)…