सर्कस चित्रपटासाठी कलाकारांनी घेतली मोठी फी, रणवीर सिंह याने तब्बल इतके कोटी…

रोहित शेट्टीचे चित्रपट कायमच बिग बजेटचे असतात. रोहित शेट्टी चित्रपटामधील कलाकारांना देखील तगडी फी देतो.
मुंबई : रणवीर सिंह याच्या सर्कस चित्रपटाची रिलीजच्या अगोदर प्रचंड चर्चा होती. परंतू चित्रपटाला ओपनिंग डेला धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. रोहित शेट्टीच्या चित्रपटाची ओपनिंग कायमच धमाकेदार ठरले. परंतू याला सर्कस हा चित्रपट अपवाद ठरला आहे. सर्कस चित्रपटाची ओपनिंग खास राहिली नाहीये. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चर्चा होती. प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यात चित्रपटाला यश मिळाले नाहीये. इतकेच नाहीतर रोहित शेट्टीच्या दहा वर्षामधील सर्वात कमी ओपनिंग करणारा सर्कस हा चित्रपट ठरला आहे.
रोहित शेट्टीचे चित्रपट कायमच बिग बजेटचे असतात. रोहित शेट्टी चित्रपटामधील कलाकारांना देखील तगडी फी देतो. सर्कस चित्रपटामध्ये कलाकारांची मोठी टीम रोहित शेट्टीने बांधली होती. या कलाकारांना मोठे मानधन देखील रोहित शेट्टी याने दिले.
सर्कस चित्रपट जरी आज बाॅक्स आॅफिसवर धमाका करत नसला तरीही या चित्रपटासाठी रणवीर सिंह याने तगडी फी घेतली आहे. रणवीर हा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. रिपोर्टनुसार सर्कस चित्रपटासाठी रणवीर सिंह याने तब्बल 25 कोटी रूपये घेतले आहेत.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सर्कस या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी जॅकलिन हिने 6 कोटी घेतले आहेत. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नाव आल्याने गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन वेळी जॅकलिन दिसली होती.
रणवीर सिंह, जॅकलिन फर्नांडिस यांच्याप्रमाणेच सर्कस चित्रपटामध्ये पूजा हेगडे देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी पूजाने 2.5 कोटी फी घेतली आहे. आता या चित्रपटाला विकेंडचा नेमका काय फायदा होतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
जॉनी लीव्हरने सर्कस या चित्रपटासाठी 1.25 कोटी फी घेतली आहे. संजय मिश्रा यांनी 1 कोटी फी घेतली आहे. म्हणजेच रोहित शेट्टी याने या चित्रपटामधील सर्व कलाकारांना मोठी तगडी फी दिली आहे. चित्रपटाची ओपनिंग खास ठरली नाहीये. परंतू पुढे हा चित्रपट धमाका करू शकतो.