सरत्या वर्षांने काय दिलं? येत्या वर्षाकडून कुठल्या आशा? शरद पवारांनी मनमोकळेपणाने सांगितलं…

सरत्या वर्षांने काय दिलं? येत्या वर्षाकडून कुठल्या आशा? शरद पवारांनी मनमोकळेपणाने सांगितलं…
नविद पठाण | Edited By: आयेशा सय्यद
Updated on: Dec 31, 2022 | 11:12 AM
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 2022 ने काय दिलं आणि 2023 कडून काय अपेक्षा आहेत, यावर बोलले आहेत.
बारामती : आज 31 डिसेंबर. 2022 वर्षातील शेवटचा दिवस. 2022 वर्ष संपत आलंय. 2023 च्या उंबरठ्यावर आपण आहोत. अशात सरत्या वर्षाने आपल्याला काय दिलं आणि येत्या वर्षात काय करायचं याची गोळाबेरीज करण्याचा हा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देताना अन् नव वर्षाचं स्वागत करताना तुमच्या आमच्याप्रमाणे राजकीय नेतेही यावर भाष्य करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 2022 ने काय दिलं आणि 2023 कडून काय अपेक्षा आहेत, यावर बोलले आहेत.
आजची तारीख 31 डिसेंबर. बरंच काही सांगून जाते… मागच्या वर्षभरात काही प्रश्न काही चांगल्या गोष्टी घडल्या… जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सामना करण्याची आवश्यकता होती ती केली… आता आपण यातून मुक्त झालो, असं शरद पवार म्हणालेत.
आता 2023 वर्ष सुरु होईल.. 1 तारीख उद्याच आहे. अवघा भारत देश औत्सुक्याने नव्या वर्षाची पाहतोय. येतं वर्ष नव्या आशा-आकांक्षांचं असेल, असं शरद पवार म्हणालेत.