सरकारचा हस्तक्षेप योग्य नाही, Fracture Freedomवादावर प्रज्ञा पवारांची थेट भूमिका

मुंबई, 14 डिसेंबर : Fractured Freedom या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार काढून घेतल्यानंतर लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. फेसुबकवर त्यासंदर्भातील पत्र पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. यानंतर महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील मोठं नाव माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही राजीनामा दिला आहे. दरम्यान, यानंतर आता प्रज्ञा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाल्या प्रज्ञा पवार –
अनघा लेले यांच्या कोबाड गांधी या अनुवादपर आधारीत पुस्तकासाठी शासकीय साहित्य निवड समितीने पुरस्कार जाहीर केला होता. पण राज्य सरकारने या पुस्तकातून नक्षलवादाचे उदात्तीकरण होत असल्याचा ठपका ठेवत हा पुरस्कार रद्द करून टाकला आहे. शासनाची ही कृती म्हणजे साहित्य क्षेञातील हस्तक्षेप असून तो आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, असा सूर पुरोगामी लेखक मंडळींना लावला आहे. त्यातूनच हे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. कोबाड गांधी लिखित मराठीत अनुवादित केलेल्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.
याबाबत त्या म्हणाल्या की, मी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यासंदर्भातील प्रधान सचिवांना पाठवलेले पत्र सर्वांच्या माहितीसाठी दिलेले आहे. पुरस्कारासाठी पुस्तकाची शिफारस करणारी परीक्षण समितीदेखील आपण एकतर्फी बरखास्त केली आहे.
हेही वाचा – Fractured Freedom पुस्तकामुळे वाद शिगेला, प्रज्ञा पवारांनंतर आणखी एका मोठ्या साहित्यिकाचा राजीनामा
तज्ज्ञांच्या निवड समितीचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाला आहे, अशी माझी धारणा आहे. याचा निषेध म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. सरकारचा यात एवढा हस्तक्षेप योग्य नाही. मुख्यमंत्री महोदय यांची आम्ही स्वतःहून भेट घेण्याचा अजून तरी काही ठरलं नाही. मुख्यमंत्र्यांनी जर बोलावलं तर, त्यांची काही बोलायची तयारी असेल त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तर आम्ही नक्कीच जाऊ. तसेच या पुस्तकाच्या संबंधित जे काय मत आहे ते आम्ही स्वतः ऐकून घेऊ. चर्चेतून या मध्ये मार्ग निघू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.