समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी थेट एसटी : जाणून घ्या सर्व डिटेल्स

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून आता नागपूर ते शिर्डी एसटीने जाता येणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आज (गुरुवार) पासून नागपूर ते शिर्डी या मार्गावर प्रवाशांसाठी खास बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमुळे प्रवासाच्या अंतरात तब्बल १०३ किलोमीटरची आणि वेळेमध्ये साडेचार तासांची बचत होणार असल्याचं महामंडळाच्यावतीने सांगण्यात आलं आहे.
नागपूर ते शिर्डी बसची खास वैशिष्ट्ये :
-
एसटी महामंडळाच्या या बसमध्ये प्रवाशांना टू बाय वन पुशबॅक पद्धतीची ३० आसने बसण्यासाठी तर १५ शयनआसने असणार आहेत.
-
ही बस नागपूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणावरून दररोज रात्री ९ वाजता सुटेल आणि पहाटे साडेपाच वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचणार आहे.
-
बस सेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०३ किलोमीटर आणि वेळेमध्ये चार तास पंधरा मिनिटांची बचत होणार आहे.
नागपूर ते शिर्डी तिकीट दर :
-
प्रौढ व्यक्ती- १ हजार ३०० रुपये
-
१२ वर्षांखालील मुलांसाठी ६६० रुपये
-
६५ ते ७५ वर्ष नागरिकांना ५० टक्के सवलत
-
७५ वर्षावरील जेष्ठांना १०० टक्के मोफत
नागपूर ते औरंगाबाद (जालना मार्गे) या मार्गावरही बस सेवा :
दरम्यान, नागपूर ते औरंगाबाद (जालना मार्गे) या मार्गावरही महामंडळाकडून बस सेवासुरू करण्यात येत आहे.
-
ही बस नागपूर आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी दररोज रात्री दहा वाजता सुटेल जालना मार्गे पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल.
-
यामध्ये प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५१ किलोमीटर आणि प्रवास वेळेत चार तास ४० मिनिटे इतकी बचत होणार आहे.
नागपूर ते औरंगाबाद तिकीट दर :
-
प्रौढ व्यक्ती- ११०० रुपये
-
१२ वर्षांखालील मुलांसाठी- ५७५ रुपये
-
६५ ते ७५ वर्ष नागरिकांना ५० टक्के सवलत
-
७५ वर्षावरील जेष्ठांना १०० टक्के मोफत
नागपूर ते जालना तिकीट दर :
-
प्रौढ व्यक्ती- ९४५ रुपये
-
१२ वर्षांखालील मुलांसाठी- ५०५ रुपये
-
६५ ते ७५ वर्ष नागरिकांना ५० टक्के सवलत
-
७५ वर्षावरील जेष्ठांना १०० टक्के मोफत