समुद्र किनारी जाताना सांभाळून, महिलेच्या अशा अवस्थे मागचं धक्कादायक कारण समोर

समुद्र-किनारी-जाताना-सांभाळून,-महिलेच्या-अशा-अवस्थे-मागचं-धक्कादायक-कारण-समोर

लंडन 24 ऑगस्ट : मुली सुंदर दिसणे आणि चांगले कपडे घालणे यावर नेहमीच भर देतात. ज्यामुळे त्या वेगवेळ्या प्रकारचे नवीन कपडे विकत घेण. मेकअप करणे आणि त्वचेसाठी फेशिअर, ग्लोइंग ट्रिटमेंट सारख्या गोष्टी करत असतात. परंतु अशातच त्यांच्या त्वचेला जरा जरी काही झालं तरी देखील मुली संपूर्ण जग उलथं-पालथं करतात. असाच एक प्रकार एका तरुणीसोबत घडला, ज्यामध्ये तिची स्किन अगदी फेविकॉलचं प्लॅस्टीक जमल्यासारखी झाली. या अशा विचित्र प्रकारामुळे या तरुणीचे फोटो व्हायरल होऊ लागले, ज्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि असं कशामुळे घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करु लागले. ज्यानंतर अखेर यामागचं कारण समोर आलं

तुम्हाला सुद्धा सन बाथ करायला आवडते का किंवा बीचवर उन्हात बसायला आवडते?

जर होय, तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण या तरुणीसोबत उन्हात बसायल्यामुळेच असा प्रकार घडला. या तरुणीचा थोडीसा निष्काळजीपणा आणि सनस्क्रीन क्रीम न वापरणे तिला महागात पडलं, ज्यामुळे तिची अशी अवस्था झाली.

रिपोर्टनुसार, ही महिला समुद्रकिनाऱ्यावर सनस्क्रीन क्रीम न लावता अर्धा तास उन्हात झोपली, पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिच्या कपाळावर फोड आले होते. त्यांना पाहून ती खूप घाबरली.

हे वाचा : Facial Hair : घरच्या घरी बनवा ही पेस्ट आणि फक्त 15-20 मिनिटं मसाज; चेहऱ्यावरील केस होतील गायब

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, ही घटना जूनमध्ये ब्रिटनच्या २५ वर्षीय सिरीन मुरादसोबत घडली होती. नुकतेच तिने सोशल मीडियावर त्याच्यासोबतच्या या घटनेबद्दल लिहिले. तिने सांगितले की ती बल्गेरियातील सनी बीचवर सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान, 21C (70F) च्या उष्णतेमध्ये ती सनक्रीम न लावता समुद्रकिनाऱ्यावर झोपली.

अर्ध्या तासानंतर तिला जाग आली तेव्हा तिला चेहऱ्यावर जळजळ जाणवली. तिने चेहरा पाहिला तेव्हा कपाळावर फोड आले होते, ते पाहून ती घाबरली. व्यवसायाने ब्युटीशियन असलेल्या सिरीने सांगितले की, तिची त्वचा अशी काही झाली होती की तिने भुवया उंचावल्या तर त्या प्लास्टिकच्या असल्यासारखे वाटत होते.

हे वाचा : Shocking! कोळी चावल्याने महिलेची इतकी भयानक अवस्था; कॅन्सरचा धोका, हात कापण्याची वेळ

त्यानंतर सिरीनने हे डॉक्टरांना दाखवले. काही दिवसांच्या उपचारानंतर ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. परंतु या घटने नंतर ती प्रत्येकाला सनस्क्रीन क्रीम लावूनच बाहेर फिरण्याचा सल्ला देते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *