समुद्र किनारा गारठणार, राज्यात पुढच्या 48 तासांत हुडहुडी भरणारी थंडी पडणार

मुंबई, 24 डिसेंबर : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आता उत्तरेकडे सरकला असून पुढील 48 तासात दक्षिणेकडून किनारी भागाकडे सरकणार आहे. यामुळे बाष्पयुक्त वारे कमी होणार आहेत. या थंड वाऱ्यांचा प्रभाव पुढील दोन ते तीन दिवसात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसात कोकणात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी मुंबईमध्येही वीकेण्डला सुखद वातावरणाची निर्मिती केली आहे. आज (दि.24) शनिवारी मुंबईत अधिक गारठा जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. मात्र, त्याचे प्रमाण अजूनही कमी आहे. पहाटे आणि सकाळी थंडी जाणवत आहे. त्यानंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत उकाडा जाणवत आहे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी थंडी असे वातावरण आहे.
हे ही वाचा : मुंबईत डिसेंबर हिट, पाहा किती आहे तुमच्या शहरातील तापमान
उत्तर आणि मध्य महाराष्ट्र
पुणेप्रमाणेच नाशिकमध्येही थंडीचा कडाका वाढलाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 16.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. तर नाशिकमध्ये किमान 16 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर, अहमदनगरमध्ये कमाल तापमान 29 अंश तर किमान 16 अंश सेल्सियस असेल, असा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये 10.4 अंश सेल्सियस किमान तापनाची नोंद झालीय. जालनामध्ये 13.5, परभणीमध्ये 13.1 तर उदगीरमध्ये 14 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे.
हे ही वाचा : शेतकऱ्यांना पुढच्या तीन तासात हवामानाची माहिती देणारे अॅप आता नव्या रुपात
विदर्भ मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही थंडीचा जोर वाढलाय. नागपूरमध्ये 12.4 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे. वर्ध्यात 13.0 तर अमरावतीमध्ये 13.8 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात 15 पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली असून सर्वात कमी किमान तापमान गोंदियामध्ये 10.5 अंश सेल्सियस इतके नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.