'सत्यजित तांबे यांचं काम चांगलं पण..' आरोपांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'सत्यजित-तांबे-यांचं-काम-चांगलं-पण.'-आरोपांवर-फडणवीसांची-पहिली-प्रतिक्रिया

पुणे, 13 जानेवारी : काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीतील युवा नेता सत्यजित तांबे यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीची चर्चा होऊ लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबद्दल पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात एक मोठं विधान केलं होतं. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे यांना किती दिवस बाहेर ठेवणार, अशा चांगल्या लोकांवर आमचा डोळा असतो. असं म्हंटलं होतं. मात्र, यावर आता खुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सत्यजित तांबे यांचं काम चांगलं : देवेंद्र फडणवीस

“आमचं धोरण बावनकुळे यांनी सांगितलं आहे. सत्यजित तांबे यांचं काम चांगलं आहे. पण कोणताही निर्णय धोरणात्मक घ्यायचा असतो. आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते. त्यामुळं हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये. योग्यवेळी सगळं समोर येईल.”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आम्ही कोणता उमेदवार द्यायची यावर चर्चा सुरू होती. राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी अशी चर्चा होती. पण, ऐनवेळी उमेदवारी द्यायचं नाही असं ठरलं, असंही फडवणीस यांनी सांगितले.

वाचा – मोदी-शहांचे पोस्टर्स हटवले, अमरावतीत कृषी प्रदर्शन केले बंद, रवी राणा भडकले

सत्यजित तांबेंबद्दल फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सत्यजित तांबे यांना मी अनेक वर्षांपासून बगत आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जे वेगळेपण असते, ते सत्यजित मध्ये पाहायला मिळतं. आशिषजी यांना प्रश्न पडला, सत्यजित तांबे परदेशात का शिकायला गेले? पण, आपल्या लोकशाहीत सर्व निर्णय राजकीय नेते घेतात. त्यामुळे ते जेवढे प्रगल्भ आणि माहिती ठेवणारे असतील, तेवढे चांगले निर्णय घेतात.” पुढं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “बाळासाहेब थोरात तुमच्याकडे एक तक्रार आहे. सत्यजित सारखे नेते, तुम्ही कितीदिवस बाहेर ठेवणार आहात. सत्यजितला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात,” असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबेंना एकप्रकारे भाजपात येण्याची ऑफरच दिली.

फडणवीसांवर काय आरोप?

सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आहेत, त्यांच्याच भाचाला तिकीट देण्याची रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी आखली होती. तर दुसरींकडे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात असताना त्यांनाही एकप्रकारे चेकमेट देऊन फडणवीस यांनी तांबे यांना पाठबळ दिले आहे. तर तिसरीकडे बाळासाहेब थोरात हे रुग्णालयात असताना सत्यजित तांबे यांना आमदार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमध्ये ऑपरेशन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे, वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म आलेला असताना निवडणुकीतून माघार घेणे आणि भाजपनेही उमेदवार न देणे ही फडणवीस यांची राजकीय खेळी असल्याचे बोललं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “'सत्यजित तांबे यांचं काम चांगलं पण..' आरोपांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *