सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाला धक्का; पुण्यातील बडा नेता शिंदे गटात

सत्तासंघर्षाच्या-निकालानंतर-ठाकरे-गटाला-धक्का;-पुण्यातील-बडा-नेता-शिंदे-गटात

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाला पहिला धक्का; पुण्यातील बडा नेता शिंदे गटात

शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का

शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का

शिंदे गटानं पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचा बडा नेता शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

संबंधित व्हिडिओ

पुणे, 17 मे : गेल्या आठवड्यात राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला. या प्रकरणावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाला पहिला धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पुणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता  महेश पासलकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

शिंदे गटात प्रवेश करणार  

महेश पासलकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. सत्तासंघार्षाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात ठाकरे गटाला हा धक्का बसला आहे. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर  महेश पासलकर यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तुमच्या शहरातून (पुणे)

  • ...तर ठाकरे गटात मोठी फूट पडणार; फडणवीसांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

    …तर ठाकरे गटात मोठी फूट पडणार; फडणवीसांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

  • सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाला पहिला धक्का; पुण्यातील बडा नेता शिंदे गटात

    सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाला पहिला धक्का; पुण्यातील बडा नेता शिंदे गटात

  • पुण्याचं खरंच होणार का विभाजन? कुणी केली मागणी, कुणाला होणार फायदा?

    पुण्याचं खरंच होणार का विभाजन? कुणी केली मागणी, कुणाला होणार फायदा?

  • महापालिका निवडणुकांची लढाई कधी होणार? फडणवीस बोलून गेले!

    महापालिका निवडणुकांची लढाई कधी होणार? फडणवीस बोलून गेले!

  • तुम्ही खात असलेली सॉफ्टी नेमकी कशी बनते? पुणेकराने दिली खास माहिती, VIDEO

    तुम्ही खात असलेली सॉफ्टी नेमकी कशी बनते? पुणेकराने दिली खास माहिती, VIDEO

  • Monsoon : दबक्या पावलांनी येणार, पण... मान्सूनचा मुहूर्त आला, या दिवशी कोसळणार!

    Monsoon : दबक्या पावलांनी येणार, पण… मान्सूनचा मुहूर्त आला, या दिवशी कोसळणार!

  • वडा पावचा स्टॉल लाथेने उडवला, पुण्याच्या उपायुक्तांची भाईगिरी, सुप्रिया सुळे भडकल्या, Video

    वडा पावचा स्टॉल लाथेने उडवला, पुण्याच्या उपायुक्तांची भाईगिरी, सुप्रिया सुळे भडकल्या, Video

  • Gold Price in Pune : पुणेकरांनो, सोनं खरेदसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'इथं' चेक करा आजची किंमत

    Gold Price in Pune : पुणेकरांनो, सोनं खरेदसाठी बाहेर पडण्यापूर्वी ‘इथं’ चेक करा आजची किंमत

  • 'देवेंद्र मुख्यमंत्री न झाल्याची सल...', फडणवीसांसमोरच भाजप नेता म्हणतो पुन्हा या!

    ‘देवेंद्र मुख्यमंत्री न झाल्याची सल…’, फडणवीसांसमोरच भाजप नेता म्हणतो पुन्हा या!

  • अवघ्या 10 वर्षांच्या मुलांसोबत हजारो फूट उंचावरून घेतली उडी, पुणेकर शीतलची थरारक कहाणी

    अवघ्या 10 वर्षांच्या मुलांसोबत हजारो फूट उंचावरून घेतली उडी, पुणेकर शीतलची थरारक कहाणी

  • दबक्या पावलांनी आला मालकाच्या उशाला झोपलेल्या कुत्र्याची शिकार करु गेला, पाहा VIDEO

    दबक्या पावलांनी आला मालकाच्या उशाला झोपलेल्या कुत्र्याची शिकार करु गेला, पाहा VIDEO

राऊतांवर आरोप  

पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे गटाला एकही जागा दिली नाही. या उलट ठाकरे गटाचे फोटो वापरून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणुका लढवल्या. या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकही जागा आपल्याला देण्यात आलेली नसताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत  मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रचाराला येत होते. उद्धव ठाकरे गटाचे खच्चिकरण करून काँग्रेस, राष्ट्रवादीला बळ देण्याच्या या प्रकारामुळे व्यथित होऊन पक्षाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Eknath Shinde, Pune, Pune news, Shiv sena, Uddhav Thackeray

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *