सत्तार-पाटील यांच्यातील वाद का आले पुन्हा चर्चेत? वाद नेमका सुरू झाला कसा…

सत्तार-पाटील-यांच्यातील-वाद-का-आले-पुन्हा-चर्चेत?-वाद-नेमका-सुरू-झाला-कसा…

पक्षातून कट रचला जात असल्याचं अब्दुल सत्तार यांनी केल्यामुळे नेमका कोणता व्यक्ती शिंदे गटातल्या धुसफुसीचं कारण ठरल आहे, हे अद्याप अधिकृतपणे समजू शकलेलं नाही.

मुंबईः शिंदे गटात धुसफूसीच्या चर्चा सुरू असतानाच काही जण आमच्या भांडणं लावत असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. मात्र भांडण लावण्यावरुन गुलाबराव पाटील यांचा महाविकास आघाडीच्या काळातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिंदे गटात कलह सुरु झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही लोकांकडून भांडणं लावण्याचं काम सुरु असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.

मात्र हाच आरोप गुलाबराव पाटील महाविकास आघाडीत असताना भाजपवर करत होते., त्यामुळे सोशल मीडियावर आता गुलाबराव यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान भाजपचं मिशन 144 आणि अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटातूनच माझ्याविरोधात कट रचले जात असल्याचा आरोप
या दोन्ही गोष्टींमुळे शिंदे गटात धुसफूस सुरु झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

पक्षातून कट रचला जात असल्याचं अब्दुल सत्तार यांनी केल्यामुळे नेमका कोणता व्यक्ती शिंदे गटातल्या धुसफुसीचं कारण ठरल आहे, हे अद्याप अधिकृतपणे समजू शकलेलं नाही.

तर दुसरीकेड मात्र पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी असं जाहीरपणे बोलणे चुकीचे असल्याचे सांगत. तुम्हाला आम्ही जनेतेची कामं करण्यासाठी वेगवेगळी पदं दिली आहेत असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *