सगळे स्पर्धक मिळून करणार प्रसादचा विषय एन्ड; प्रेक्षक म्हणाले, 'त्याला टार्गेट..

मुंबई, 11 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या सोशल मीडियावरही ‘बिग बॉस मराठी 4’ चा गाजावाजा पहायला मिळतोय. ‘बिग बॉस मराठी’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला असून प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर ते आपल्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. अशातच बिग बॉसच्या आजच्या भागाचा प्रोमो व्हिडीओ समोर आलाय. आता घरात सगळे स्पर्धक मिळून प्रसाद जवादेचा विषय संपवणार आहेत. काय घडणार नेमकं बिग बॉसच्या घरात पाहा.
बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यात आता दोन दिवस घरात बिग बॉसची चावडी सुरु आहे. त्यात महेश सर स्पर्धकांच्या आठवड्याभराच्या वागण्याचा हिशेब मांडणार आहेत. त्यातच घरात महेश मांजरेकरांनी स्पर्धकांना ‘My friend, विषय end’ हे टास्क दिलं आहे. यामध्ये स्पर्धकांना एका दुसऱ्या स्पर्धकांचा न आवडणारा गुण सांगून विषय संपवायचा आहे. पण आता त्यात एकाच स्पर्धकाचं नाव सगळे घेणार आहेत. तो म्हणजे प्रसाद जवादे.
हेही वाचा – वैभव मांगले नंतर आता छोट्या पडद्यावर हा अभिनेता साकारणार स्त्री पात्र; फर्स्ट लूक पाहून प्रेक्षक म्हणाले…
समोर आलेल्या प्रोमोनुसार, या टास्कमध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्नेहलता प्रसादच्या नावाची पाटी फोडते. ती म्हणते ‘तो आत एक आणि बाहेर एक वागतो. मी त्याला आधीपासून ओळखतो. तो जसा स्वतःला हळवा दाखवतो तसा तो नाहीये.” त्यानंतर अक्षय आणि अमृता देशमुख सह अमृता धोंगडे सुद्धा प्रसादची पाटी फोडतात. अमृता धोंगडे म्हणते, ”मला तो नकली वाटतो’ तर अमृता देशमुख म्हणते, ”सगळी नकारात्मकता जी आहे ती तुझ्याकडेच ठेव’. त्यानंतर अक्षय म्हणतो, ”मला तुला या घरात पाहायची तर इच्छा नाहीच आहे पण घराबाहेरही पाहायचं नाहीये.”
आता हे सगळं महेश सरांसमोर होणार आहे. त्यामुळे ते यावर काय बोलतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण प्रेक्षकांना मात्र वाटतंय कि, प्रसाद जावडेला टार्गेट केलं जातंय. अशा कमेंट्स अनेकांनी या पोस्टवर केल्या आहेत. एका प्रेक्षकाने लिहिलंय कि, ‘जो टार्गेट होतो तो end पर्यंत जातो so very good’ तर दुसऱ्याने लिहिलंय कि, ‘प्रसाद आम्ही आहोत तुझ्या सोबत.’ अशा भावना चाहते व्यक्त करत आहेत.
बिग बॉस मराठी 4च्या घरात सध्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांमुळे खेळ चांगलाच रंगला आहे. राखी सावंत, मीरा जगन्नाथ, आरोह वेलणकर आणि विशाल निकम यांनी घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेत खेळाचा पॅटर्नच बदलून टाकला. त्यातील मागच्या आठवड्यात विशाल आणि मीरा यांनी घरातून एक्झिट घेतली. मात्र राखी आणि आरोह घरात कायम आहेत. त्यातही राखीचा घरातील वावर चांगलाच गाजतो आहे. आता या आठवड्यात घरातून कोण एक्झिट घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.