संतोष बांगर या ना त्या नावानं चर्चेत, आता चंद्रकांत खैरे यांनाचं दिलं हे आव्हान

संतोष-बांगर-या-ना-त्या-नावानं-चर्चेत,-आता-चंद्रकांत-खैरे-यांनाचं-दिलं-हे-आव्हान

खैरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना बांगर यांनी खैरेंच्या काही क्लिप्स आपल्याकडे असल्याचं सांगितलं.

संतोष बांगर या ना त्या नावानं चर्चेत, आता चंद्रकांत खैरे यांनाचं दिलं हे आव्हान

संतोष बांगर, चंद्रकांत खैरे

नागपूर : शिंदे गटाचे नेते संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. बांगर यांनी संजय राऊतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं चंद्रकांत खैरेंनी बांगर यांच्यावर टीका केलीय. त्याला आता बांगर यांनी प्रत्युत्तर दिलंय. संतोष बांगर म्हणाले होते, संजय राऊत हा पागल झालेला पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. संतोष बांगर हा तडीपार आणि बरेच खुनाचे आरोप त्याच्यावर आहेत. सरळ करुन टाकू तुला आम्ही. मी स्वत: सरळ करेन.

संतोष बांगर म्हणाले, चंद्रकांत खैरे वयाचं भान ठेवलं. आम्ही जर यांचं भांडं खोललं, तर मला वाटतंय चंद्रकांत खैरेंच्या क्लिप बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आधी संजय राऊतांना आव्हान देणाऱ्या संतोष बांगरांनी आता चंद्रकांत खैरेंना आव्हान दिलंय.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. आणि त्यानंतर बांगर यांनी संजय राऊतांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं. बांगर यांनी संजय राऊतांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं चंद्रकांत खैरेंनी त्याला उत्तर दिलं. आणि बांगर यांच्यावर तडीपारी आणि खुनाचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला.

चंद्रकांत खैरे म्हणाले, संतोष बांगर हा तडीपार आणि बरेच खुनाचे आरोप त्याच्यावर आहेत. आणि बऱ्याच वेळेला पक्षानं मदत केली होती. आदल्या दिवशी रडत होता. दुसऱ्या दिवशी उडी मारुन जातो. हा संजय राऊतांवर बोलतो. आज शिवसैनिक चिडले आहेत. बांगर कोण आहे. किती वेळा संजय राऊत साहेबांच्या पाया पडायला गेला होता. आम्ही रझाकरांच्या विरोधात लढलेली लोकं आहोत. तू कोण आहे. सरळ करुन टाकू तुला आम्ही. मी स्वत: सरळ करेन.

खैरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना बांगर यांनी खैरेंच्या काही क्लिप्स आपल्याकडे असल्याचं सांगितलं. क्लिप्स बाहेर आल्या तर खैरेंना आत्महत्या करावी लागेल असंही बांगर म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *