संतुबाई महिला लघुउद्योग ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा इचलकरंजी, राष्ट्रसेवा दल व लोक क्रांती सोशियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सांगली

 

मिरज प्रतिनिधी-अशोक मासाळ
आपल्या कुटुंबापासून ते देशाच्या विकासमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे या दिवशी महिलांच्या प्रती आदर व्यक्त केला जातो महिलांनी आजच्या युगामध्ये सक्षम व स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये धाडसाने पुढाकार घेतला पाहिजे असे मत राष्ट्र सेवा दलाचे मा बाबासाहेब नदाफ यांनी मांडले.
गेली अनेक वर्ष संतुबाई महिला लघु उद्योगाचे कार्य हे कौतुकास्पद व समाज हिताचे आहे कोणाच्या काळात या मंडळाने अनेक महिलांना मास्क बनवण्याच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला होता या मंडळामार्फत समाजसेवा जपण्याचा आणि समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मंडळ आहे असे मत नगरसेविका मा आरोग्य सभापती सौ संगीता राजू आलासे यांनी कार्याचे कौतुक केले .
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा इचलकरंजीचे अध्यक्ष मा सुरेंद्र दास यांनी ग्राहक पंचायत चे महत्व कार्य तसेच ग्राहकांचे अधिकार पटवून दिले कोणतीही खरेदी करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ग्राहकांच्या फसवणुकीला आळा घातला पाहिजे आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण आवाज उठवला पाहिजे यासाठी ग्रामपंचायत आपल्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही श्री सुरेंद्र दास सर यांनी दिली.
चार हजारहून अधिक बेवारस अपघाती तात्या केलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावणारे मानव सेवा संस्था कोल्हापूर अध्यक्ष मा किशोर ननवाणी व सुप्रिया देशपांडे यांचे विशेष गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी संतुबाई महिला उद्योगाच्या वैशाली शेलार नंदनी शेलार सुष्मिता साळुंखे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मा सुरेंद्र दास सर उपाध्यक्ष अरुण साळुंखे व त्यांचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते महिला संघटिका संजीवनी हरिहर संचालक विजय पाटील तसेच मीडिया रिपोर्टर सारंग दास व अन्य मान्यवर उपस्थित होते.
शेवटी आभार हरिकृष्ण अडकिल्ल यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *