शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा इथे अनुयायांनची अलोट गर्दी; प्रकाश आंबेडकरांनी केले अभिवादन | पुढारी


पुणे : पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा करण्यात येत असून विजयस्तंभास फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आज सकाळी आठ वाजल्यापासून अभिवादनासाठी विजयस्तंभ खुले करण्यात आले आहे. विजस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी आज सकाळी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.
कोरेगाव भीमा परिसरामध्ये या अभिवादन सोहळ्याला यात्रेचं स्वरूप आले असून सर्व नागरिकांनी अगदी शांत आणि आनंदाच्या वातावरणात सोहळ्याला सुरवात केली आहे. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी भीमा नदीच्या तीरावर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातून लाखो अनुयायी या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास येत असतात. या सोहळ्याला सकाळी प्रकाश आंबेडकरांनी भेट देऊन विजस्तंभाला अभिवादन केले.
Back to top button