शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाला; उद्धव, आदित्य ठाकरेंचे फोटो काढले

शिवसेना-पक्ष-कार्यालय-शिंदे-गटाला;-उद्धव,-आदित्य-ठाकरेंचे-फोटो-काढले

News

  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या &nbsp/ नागपूर
  • Winter Assembly Session: शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाला; उद्धव, आदित्य ठाकरेंचे फोटो काढले

Winter Assembly Session: शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाला; उद्धव, आदित्य ठाकरेंचे फोटो काढले

जेथे समाजवादी पार्टी, शेकाप सारख्या छोट्या पक्षांची कार्यालये होती, त्या बॅरेक क्रमांक 5 मध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाला कार्यालय देण्यात आले.

Shiv Sena main office occupied by Shinde group Uddhav Thackeray group went to the corner In Nagpur Vidhan Bhavan Winter Assembly Session: शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाला; उद्धव, आदित्य ठाकरेंचे फोटो काढले

विधानभवन परिसरात लहान पक्षांच्या कार्यालयाच्याही नंतर बराक क्रमांक पाच हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आला आहे.

Winter Assembly Session Nagpur : नागपूर विधानभवन (Nagpur Vidhan Bhavan) परिसरात सर्व राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. अधिवेशनाची घोषणा झाल्यानंतर सर्व कार्यालयांची साफ सफाई आणि रंग रंगोटी करण्यात आली. फलकेही स्वच्छ करण्यात आले. पण शिवसेना कार्यालयाचा फलक अधिवेशनाच्या पूर्व संध्येपर्यंतही झाकून ठेवण्यात आला होता. तेव्हापासून हे कार्यालय कुणाला मिळणार, हा प्रश्‍न अनुत्तरित होता. अखेर या कार्यलयावर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं कब्जा मिळवला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला दुसरं कार्यालय देण्यात आलेय. 

अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयात आपले बस्तान बसवले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटोही लावले होते. काही दिवस ठाकरे गटाचे लोक येथे बसलेसुद्धा. काल, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर पुन्हा तोच प्रश्‍न चर्चेला आला. अखेर आज सकाळी त्या कार्यालयातून उद्धव ठाकरे (uddhav thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे फोटो हटवून तेथे शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला. 

बाळासाहेबांची शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे प्रतोद यांच्या नावाचे फलक लागले आणि जेथे समाजवादी पार्टी, शेकाप सारख्या छोट्या पक्षांची कार्यालये होती, त्या बॅरेक क्रमांक 5 मध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाला कार्यालय देण्यात आले. हे कार्यालय विधानभवन इमारत परिसराच्या अगदी शेवटच्या भागाला फाटकाजवळ आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुख्य कार्यालय शिंदे गटाला तर उद्धव ठाकरेंच्या गटाला कोपऱ्यात फेकल्यासारखे झाले आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन गट पडले. एकनाश शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या धुनष्यबाणावरही दावा केला. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रलंबित असताना विधिमंडळातील धनुष्यबाण चिन्ह झाकण्यात आले. येथील कार्यालयावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. या कार्यालय दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला होता.  विधिमंडळ सचिवालयाने हे कार्यालय प्रथम ठाकरे गटाला दिले होते. कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही लावण्यात आले होते. परंतु आज कार्यालयातील चित्र बदलले होते. कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या फोटोऐवजी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो होतो. शिवाय प्रतोद म्हणून शिंदे गटातील नेत्याचे नाव होते. तर एका कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे.

News Reels

ही बातमी देखील वाचा

‘आई’ आणि ‘लोकप्रतिनिधी’ सरोज अहिरेंची दुहेरी भूमिका, अडीच महिन्याच्या बाळाचं विधानभवनात पहिलं पाऊल

Published at : 19 Dec 2022 04:02 PM (IST) Tags: Vidarbha Nagpur News nagpur vidhan bhavan Winter Assembly Session Shivsena Nagpur ‘Eknath Shinde : Uddhav Thackeray

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *