शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हायरल वाद, भाजपच्या या नेत्यानं मागितली माफी

शिवरायांच्या-एकेरी-उल्लेखाचा-व्हायरल-वाद,-भाजपच्या-या-नेत्यानं-मागितली-माफी

वादग्रस्त विधानांच्या मालिकेत रावसाहेब दानवे यांच्या जुन्या व्हिडीओची भर पडली.

मुंबई : प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. प्रसाद लाड यांच्यावर शिंदे गटाचे नेत संजय गायकवाड यांनी टीका केली. शिवाजी महाराज यांचा अवमान कुणी करून नये. परंतु, त्यांचा अवमान करणारं वक्तव्य कुणी करू नये, असे बोलताना रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. संजय गायकवाड यांनी रावसाहेब दानवे यांच्या या एकेरी वक्तव्यावर चांगलाच समाचार घेतला. संजय गायकवाड म्हणाले, तुम्ही तुमच्या बापाला कधी एकेरी नावानं बोलविता का, भाजपच्या नेतृत्वानं अशा या वाचाळविरांना आवरावं लागले, असा सल्ला संजय गायकवाड यांनी दिला.

वादग्रस्त विधानांच्या मालिकेत रावसाहेब दानवे यांच्या जुन्या व्हिडीओची भर पडली. शिवाजी महाराज यांच्यावरील एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ काल समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर दानवे यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

रावसाहेब दानवे म्हणाले, नाशिक दौऱ्यावर असताना राज्यपालांवर मला प्रतिक्रिया विचारली होती. तेव्हा माझ्याकडून एकेरी उल्लेख केला गेला होता. त्यावेळी मी सर्व देशवासियांची माफी मागितली होती.

पण, हे वक्तव्य जुनं आहे. त्यावेळी मी माफी मागितली होती. पुन्हा मी माफी मागतो, असं रावसाहेब दानवे म्हणाले. त्याही वेळी राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

राज ठाकरे यांनीसुद्धा राज्यपाल यांच्यावर टीका केली होती. तुम्हाला रामदास स्वामी, शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही कळतं का, तुम्हाला काही माहीत आहे का, असं खडसावलं होतं. आपला काही संबंध नसताना, काही अभ्यास नसताना कशाला बोलायचं. नुसती भांडण लावायची. एकाचं शौर्य कमी करायचं. दुसऱ्याची विद्वता कमी करायची, असं राज ठाकरे यांनी राज्यपालांना खडसावलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *