शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व कोरणा योद्धा चा सन्मान

जळगाव

कजगाव ता भडगाव-प्रतिनिधी संजय महाजन
चाळीसगाव – छत्रपती शिवाजी महाराजां च्या काळात परकीय आक्रमण होत असे या कठीण काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांना सोबत घेऊन सर्व आक्रमण परतवून लावले. रयतेचे स्वराज्य निर्माण करून शिवाजी महाराजांनी आपल्या समोर एक आदर्श निर्माण केला त्यांचे विचार जर आपण सर्वांनी आत्मसात केले तर जनकल्याणाचे कार्य आपल्या हातून घडेल असे प्रतिपादन रयत सेना आयोजित शिवजयंती कार्यक्रमात पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
रयत सेना आयोजीत शिवजयंती निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले. तदनंतर कोरणा काळात ज्या योद्ध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर राहुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली त्यात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ बि पी बाविस्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे,आरोग्य सेविका , आशा वर्कर्स, व आरोग्य विभाग, व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरणा योद्धा म्हणून रयत सेनेच्या वतीने सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच प्राईम फोकस चे स्पन्निल वडनेरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता बद्दल पुरस्कार मिळल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले. विचार मंचावर आमदार मंगेश चव्हाण ,महानंदा डेअरी संचालक प्रमोद पाटील ,रयत सेना संस्थापक गणेश पवार,जेडीसीसी बँक संचालक राजेंद्र राठोड, डॉ सुनील राजपूत ,नगरसेवक भगवान राजपूत , रामचंद्र जाधव , दीपक पाटील ,वैद्यकीय अधिकारी अनुराधा खैरनार,नगरसेविका संगीता गवळी, विजया पवार ,ह्युमन राईट्स अध्यक्ष सुमित भोसले,हिरापूर ग्रा प उपसरपंच संतोष निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते आमदार चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करून एक आदर्श निर्माण केला . शिवरायांचा आदर्श राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी घेऊन आपण समाजात चांगले कार्य आपल्या हातून घडेल असे सांगत कोरोना काळात रयत सेनेने रयतेसाठी लढणाऱ्या आधुनिक योद्ध्यांचा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात सेवा दिली अशांचा सन्मान केला खऱ्या अर्थाने हा सन्मान सार्थक आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. नगरसेवक रामचंद्र जाधव म्हणाले की या जगाचे व देशाचे अस्तित्व आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार देशाला व जगाला प्रेरणा देत राहील. स्वराज्य ही संकल्पना घटनेत उतरवण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले. कोरोना काळात रस्त्यावर २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभाग व आरोग्य विभागाने जीवाची परवा न करता जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली अशा योद्ध्यांचा सन्मान रयत सेनेच्या वतीने कोरणा योद्धा म्हणून सत्कार करण्यात आल्याने त्यांना काम करण्याची प्रेरणा देण्याचे काम रयत सेनेने केले . शिवजयंती ही विचाराची शिवजयंती रयत सेनेने साजरी केली असे सांगत गणेश भाऊ पवार यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.नवनियुक्त ग्रा प सदस्य भाऊसाहेब पाटील,विनायक मांडोळे ,बाजार समिती संचालक म्हणून निवड झालेले गोकुळ कोल्हे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला ,कार्यक्रमास योगेश पाटील,अरुण पाटील,भिकन पवार,मनोज भोसले,भागवत पाटील,पंकज पाटील,कैलास पाटील,नितीन माळे,सतीश पवार,भष्ट्राचार नि समिती अध्यक्ष मुकेश गोसावी,प्रा रवि चव्हाण,डॉ दिलीप भवर ,राकेश राखुंडे,रयत क्रांतीचे पप्पु पाटील,बाळु पवार,सोमनाथ गवळी,सुनिल पवार,अनिल कापसे ,बंडु पगार ,दिलीप पवार,रमेश पवार,अनिल पवार ,शुभम पाटील,भूषण पाटील,विलास पाटील,निंबा पाटील आदि तर रयत सेनेचे पि एन पाटील, प्रमोद पाटील,संजय कापसे,दिनेश चव्हाण,विलास मराठे,योगेश पाटील,देवेंद्र पाटील,भरत नवले,छोटु अहिरे,दिपक देशमुख,कुलदीप पाटील,विकास पवार,अमोल देठे,दिनेश गायकवाड उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंद पवार,अनिकेत शिंदे,गौरव शिंदे,शुभम पाटील,मयुर पवार,चेतन पवार,मंगेश देठे ,सागर घाडगे,प्रवीण पवार,शरद पवार यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नागमोती यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश चव्हाण यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *