शिखर धवनचं करिअर संपलं?; वनडे टीममधून आउट, 5 सामन्यात केल्या फक्त 49 धावा

शिखर-धवनचं-करिअर-संपलं?;-वनडे-टीममधून-आउट,-5-सामन्यात-केल्या-फक्त-49-धावा

श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

All Photo Credit Instagram

खराब फॉर्ममुळे डावखुरा फलंदाज शिखर धवनला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

धवनला डच्चू मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण गेल्या काही मालिकांमध्ये तो टीम इंडियाचा कर्णधारही होता.

त्याच्यासाठी हे स्पष्ट संकेत आहेत की तो चांगला खेळला तरच संघात राहील आणि पुढील वर्षी (2023) होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवू शकेल.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून धवनला डच्चू मिळणे त्याच्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्यासारखे आहे.

धवन येथून चांगला खेळ करुन परत येऊ शकला नाही, तर त्याच्यासाठी करिअर संपवल्यासारखे होईल.

शेवटचा बांगलादेश दौरा धवनसाठी चांगला गेला नाही. त्याने मागच्या पाच सामन्यात फक्त 49 धावा केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *