शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; भीमशक्ती, शिवशक्ती एकत्र; आज युतीची घोषणा!

शिंदेंचा-उद्धव-ठाकरेंना-मोठा-धक्का;-भीमशक्ती,-शिवशक्ती-एकत्र;-आज-युतीची-घोषणा!

मुंबई, 4 जानेवारी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटआणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासू सुरू आहे. तसे संकेत दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांकडून मिळत आहेत. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मोठी बातमी समोर येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षांची अधिकृत युती आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या निमित्तानं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहे.

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी एक वाजता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे हे अधिकृतरित्या युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आज एकनाथ शिंदे यांनी युतीची घोषणा केल्यास हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असणार आहे.

हेही वाचा : Supriya Sule : भाजपने महागाईवरही रस्त्यावर उतरावं, सुप्रिया सुळेंनी केली अजितदादांची पाठराखण

ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडू याबाबत अनेकदा संकेत देण्यात आले आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे मात्र आज एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबाची शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षांची अधिकृत युतीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *