शाहरुखच्या 'पठाण' ला 'गांधी गोडसे एक युद्ध' देणार बॉक्स ऑफिसवर टक्कर

शाहरुखच्या-'पठाण'-ला-'गांधी-गोडसे-एक-युद्ध'-देणार-बॉक्स-ऑफिसवर-टक्कर

मुंबई, 16 डिसेंबर :  सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत खूप वाद सुरु आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण‘ चित्रपटामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं आहे. तर काही चित्रपट कमी प्रतिसाद मिळण्याच्या भीतीने थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येत आहेत. अशातच अजून एका चित्रपटाची घोषणा झाली आहे. ८० दशकातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार संतोषी आता तब्बल 9 वर्षांनी बॉलिवूडमध्ये नव्या कोऱ्या चित्रपटासह पदार्पण करणार आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नुकतंच या चित्रपटाची घोषणा झाली असून सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.

गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्ध आपण बघत आलो आहोत. बऱ्याच कलाकृतीमधून यावर भाष्यदेखील करण्यात आलं आहे. शिवाय महात्मा गांधी यांच्यावरदेखील बरेच चित्रपट बनले. आता याच २ विचारधारांमधील युद्ध पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राजकुमार संतोषी यांनी नुकतीच आपल्या चित्रपटाची घोषणा केली असून त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्ट बाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा – Vivek Oberoi : ऐश्वर्या सोबतच्या नात्यावर अखेर विवेक ओबेरॉयनं सोडलं मौन; म्हणाला, ‘तो काळ आयुष्यातील सर्वात…’

‘गांधी गोडसे एक युद्ध’ मध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे या दोन विरोधी विचारसरणींमधील युद्ध दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी निर्मात्यांनी नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. या चित्रपटात ऑस्कर आणि ग्रॅमी विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांचे संगीत असेल. संतोषी प्रॉडक्शन LLP च्या मनिला संतोषी निर्मित, हा चित्रपट PVR पिक्चर्स रिलीज आहे. हा चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘गांधी- गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट पुढील प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. पण याचदरम्यान शाहरुख खानचा बहुचर्चित सिनेमा पठाण देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी रोजी तर ‘गांधी- गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट 26 जानेवारीला  प्रदर्शित होणार आहे. जरी SRK चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी प्रदर्शित होणार असला तरी, तो त्याच आठवड्यात आणि फक्त एक दिवसाच्या अंतराने आहे.

सध्या पठाण चित्रपटाविषयी नकारात्मक वातावरण आहे. सोशल मीडियावर हा चित्रपट बॉयकॉट  करण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच आता ‘गांधी- गोडसे एक युद्ध’ हा चर्चित चित्रपट त्याच काळात रिलीज होणार आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांत प्रेक्षक विभागले जाणार हे नक्की. अशात आता शाहरुख ४ वर्षांनंतर कमबॅक करत असलेल्या या चित्रपटाला फटका बसणारे कि तो तरून  जाणार हे पाहणं महत्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *