शासकीय कर्मचारी व शिक्षकांसाठी असलेल्या विमा योजनेचा कालावधी वाढविण्यात यावा -गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांची मागणी

पुणे

 

पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे

शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक यांच्यासाठी असलेल्या विमा योजनेचा कालावधी डिसेंबर 2020 ला संपला असून तो वाढविण्यात यावा अशी मागणी श्री गौतम कांबळे राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ संलग्न मूलनिवासी शिक्षक संघ यांनी केली आहे याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री गौतम कांबळे म्हणाले की गेले वर्षभर राज्य सरकार covid-19 सोबत लढत आहे .सदर लढ्यात मा. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , आरोग्य मंत्री व सर्व मंत्रीमहोदय यांनी या काळात अतिशय उत्कृष्ट नियोजन करून कोरोना संक्रमणापासून सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी भरपूर प्रयत्न केलेत . अनेक आरोग्य सुविधा शासनाचे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग बंद असताना उभे केलेत याबद्दल सरकारचे आम्ही सर्व शिक्षक बांधव ॠणी आहोत .सदर लढ्यात आमचे कित्येक शिक्षक बांधवांनी कोरोना कार्यात अक्षरशः प्राणांची आहुती दिली आहे . त्यांना ही विसरून चालणार नाही .यामुळे आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की नवीन कोरोना द्वीतीय संक्रमण लाटेमध्ये आपले शासकीय कर्मचारी व शिक्षक बांधव ही कोरोना ड्यूटीवर आहेत .सदर कार्यात आपले शिक्षक व इतर शासकीय कर्मचारी कोरोना संक्रमित लोकांच्या थेट संपर्कात येत असूनही आदेशाप्रमाणे काम करत असल्यामुळे त्यांना सर्वात जास्त संक्रमण होण्याचा धोका आहे व मृत्यू ओढवला जाऊ शकतो तरी वरील संदर्भीय वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०२० या संदर्भीय पत्रानुसार देण्यात आलेली मुदत वाढ संपली असून डिसेंबर २०२१ पर्यंत ही मुदतवाढ करण्यात यावी . पन्नास लाख शासन विमा कालावधी वाढवून त्याचा लाभ शिक्षक बांधवासहीत सर्व शासकीय कर्मचारी जे कोरोना कार्यात स्थानिक पातळीवर आदेशीत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना विमा योजनेचा लाभ देण्यात यावा . पन्नास लाखाचा विमा शासन निर्णय वित्त विभाग दिनांक २९ मे २०२० अन्वये दिनांक १४ ऑक्टोबर २०२० ह्या शासन निर्णयात मुदत वाढ करावी .तसेच covid-19 चे कामकाजात सहभागी असताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ देण्यात यावा .शिक्षक बांधव व इतर सर्व कोविड योद्धे यांच्या कुटुंबीयांना हा विमा विनाविलंब मिळावा व शासन निर्णयास मुदतवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित व्हावा अशी विनंती निवेदनाद्वारे मा .उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आली आहे .या निवेदनाच्या प्रती मा. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य
मा. राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य
मा . राहुलदादा कुल आमदार दौंड विधानसभा
मा.मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आल्या आहेत अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री गौतम कांबळे यांनी दिली .यावेळी श्री विठ्ठल सावंत राज्य महासचिव ,श्री हौशीराम गायकवाड राज्य कार्याध्यक्ष तसेच श्री दादा डाळिंबे राज्य कोषाध्यक्ष उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *