शाळेत अनावश्यक काम नसताना शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावू नये समता शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष बी एन पाटील

जळगाव

 

कार्यकारी संपादक- कुंदन बेलदार
पाचोरा दिनांक २४ जुन २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत महिला शिक्षक, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार व ५५ वर्षांवरील पुरुष शिक्षकांना शाळेत बोलावू नये. तसेच अत्यावश्यक काम असेल तरच शिक्षकांना आठवड्यातून १ किंवा २ दिवस बोलवावेत अशा सूचना परिपत्रकात दिलेले असताना सुद्धा अनेक ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाकारण शाळेत – कनिष्ठ महाविद्यालयात बोलविण्याचे प्रकार घडत आहेत.
कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष शाळा भरविणे शक्य नसल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. दिनांक २४ जून २०२० च्या शासन परिपत्रकानुसार वर्क फ्रॉम होम ची सवलत देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने या घटनांमुळे शिक्षकांना आर्थिक, मानसिक त्रास होत असून कोरोना संसर्गाची भीती वाटत आहे. शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयाना २४जून २०२० रोजीच्या शासन परिपत्रकाबाबत अवगत करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाकारण शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात न बोलविण्याबाबत सूचना तात्काळ द्याव्यात, शाळेत व महाविद्यालयात फक्त तीस टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलवावे यात ५५ वर्षावरील उच्च रक्तदाब मधुमेह व अन्य व्याधी असलेल्यांना यातून वगळावे अशी मागणी माध्यमिक चे समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बी एन पाटील,प्रमोद आठवले, उपाध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस रणजीत सोनवणे सह सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *