शाळकरी विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला अपघात, 27 मुली जखमी

बारामती, 31 डिसेंबर, जितेंद्र जाधव : बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून, 24 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे. इचलकरंजी येथील सागर क्लासकडून विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही सहल औरंगाबाद आणि शिर्डी अशी आयोजित करण्यात आली होती. मात्र शिर्डी येथून परत इचलकरंजीकडं जाताना बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावात या बसचा अपघात झाला. जखमी विद्यार्थीनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पाहुणेवाडी गावात अपघात
आपघाताबाबत अधिक माहिती की, इचलकरंजी येथील सागर क्लासकडून सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद आणि शिर्डी अशी ही सहल होती. या सर्व विद्यार्थीनी यशोदा ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करत होत्या. शिर्डीवरून इचलकरंजीकडं जाताना बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावात हा अपघात झाला. या अपघातामध्ये 24 मुली किरकोळ व 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी बारामतीच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये एकूण 48 मुली व 5 शिक्षक प्रवास करत होते.
हेही वाचा : “एक चान्स दे” म्हणत वडिलांच्या मित्राची भयानक मागणी, औरंगाबादमधील संतापजनक घटना
नियंत्रण सुटल्याने अपघात
अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या अपघातामध्ये एकूण 27 मुली जखमी झाल्या असून, त्यापैकी तीन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.