शाईफेक प्रकरणात संशयितांना जामीन मिळाला…समर्थकांनी हार घातला… पिंपरी चिंचवडमध्ये केला जल्लोष

शाईफेक-प्रकरणात-संशयितांना-जामीन-मिळाला…समर्थकांनी-हार-घातला…-पिंपरी-चिंचवडमध्ये-केला-जल्लोष

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांच्या अवमान केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथे मनोज गरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगीसे यांनी शाईफेक केली होती.

शाईफेक प्रकरणात संशयितांना जामीन मिळाला...समर्थकांनी हार घातला... पिंपरी चिंचवडमध्ये केला जल्लोष

Image Credit source: TV9 Network

रणजीत जाधव, पिंपरी चिंचवड : भाजप नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना आज जामीन मंजूर झाला आहे. मनोज गरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगीसे या तिघांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. संशयित तिघांनाही जामीन मंजूर झाल्यानंतर समर्थकांनी तिघांचेही जोरदार स्वागत केले आहे. त्यांना हार घालत, ढोल ताशा वाजवत, नाचत आणि फुगडी खेळत स्वागत करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या ते सरकारवर अवलंबून राहिले नाही असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली होती. त्यावरून चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झाले होते, यामध्ये जीवे मारण्याचा कलम देखील लावण्याची तयारी झाली होती त्यात पत्रकार आणि पोलीस यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, झालेला विरोध बघता ती कारवाई मागे घेण्यात आली होती.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांच्या अवमान केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथे मनोज गरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगीसे यांनी शाईफेक केली होती.

त्यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामध्ये 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले होते. राजकीय दाबापोटी हे कलम लावण्यात आल्याचे आरोपी चे वकील सचिन भोसले यांनी सांगितलं होतं.

शाईफेक करणाऱ्या तिघांवर 307 कलामासह इतर कलम लावण्यात आले होते, विरोधकांनी भाजपावर टीका केल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (307) हे कलम कमी केले होते.

पिंपरी चिंचवड मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *