विमान तब्बल 37,000 फूट उंचीवर अन् दोन्ही पायलट गाढ झोपेत; प्रवाशांचा जीव धोक्यात

विमान-तब्बल-37,000-फूट-उंचीवर-अन्-दोन्ही-पायलट-गाढ-झोपेत;-प्रवाशांचा-जीव-धोक्यात

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : जर विमान 37000 फूट उंचीवरुन उडत असेल आणि दरम्यान पायलट झोपले तर काय होईल? सूडानच्या खारतूममध्ये आदिस अबाबा येथे जाणाऱ्या इथियोपियन एअरलाइन्सचे दोन्ही पायलट इतके गाढ झोपले की, ते विमान लँड करायचंच विसरून गेले. ही घटना सोमवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एअरपोर्टच्या जवळ पोहोचल्यानंतर फ्लाइट ईटी 343 ने लँडिगचा प्रयत्न केला नाही, म्हणून ट्रॅफिक कंट्रोलने अलर्ट पाठवला. बरेच प्रयत्न करूनही एटीसी पायलटांशी संपर्क करू शकले नाहीत.

ऑटो पायलट बंद झाल्यामुळे वाजलेल्या अलार्ममुळे झोप उडाली

पायलट झोपेत असल्या कारणाने ऑटो पायलटच्या साहय्याने विमान हवेत उडत होतं. एविएशन हेराल्डने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा विमानाने रनवे क्रॉस केलं तर ऑटो पायलट डिसेबल झालं. यानंतर विमानात जोरजोरात अलार्म वाजू लागला. ज्यानंतर दोन्ही पायलटांची झोप उडाली. यानंतर त्यांनी विमानाचा कंट्रोल आपल्या हातात घेतला. यानंतर तब्बल 25 मिनिटांनंतर विमानाला पुन्हा रनवेच्या दिशेने नेण्यात आलं. येथे विमान सुरक्षितपे लँड करण्यात आलं. सुदैवाने यात कोणताही अपघात घडला नाही.

बँकेची मालकीणचं 68 कोटींची कॅश घेऊन प्रायव्हेट जेटने फरार; तिजोरी पाहून कर्मचारी हादरले!

पायलट दमले होते म्हणून..?

एविएशन सर्विलान्स सिस्टममधील माहितीनुसार, विमान रनवेच्या वरुन उडालं होतं. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोनुसार, विमान आदिस अबाबा एअरपोर्टवरुन फिरताना दिसलं. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पायलट अधिक दमल्यामुळे अशा प्रकारची घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *